चां.बा.हद्दीतील दीव्यांग बांधवांच्या सानुग्रह निधीमध्ये वाढ करा ; चांदूर बाजार भाजपाची न.प. प्रशासनाला मागणी

0
341
Google search engine
Google search engine

 

– *चांदूर बाजार*

चांदूर बाजार हद्दीतील दरवर्षी दिव्यांग बांधवांना नगरपालिकेच्या हस्ते वाटप करण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदान निधी २ हजार रुपयांमध्ये वाढ करून ५००० रुपये दिव्यांग बांधवांना देण्यात येण्याची मागणी चांदूरबाजार भाजपाने न.पा. प्रशासनाला केली सशक्त आणि सुदृढ मूल असावे प्रत्येकाचेच स्वप्न असते मात्र काही स्वप्नांना अपंगत्वाचा शाप जन्मत:च लाभतो अवयव बुद्धी गती मतीमधे असहकार असलेले मूल व त्याचे कुटुंबीय नित्य नव्याने वेगवेगळ्या समस्येला आयुष्यभर तोंड देत राहतात त्यामुळे अशा दिव्यांग बांधवांना रोजगारांपासून वंचित राहावे लागते त्या अनुषंगाने दिव्यांग बांधवांचे गरजा पूर्ण व्हावे करिता चांदूर बाचार नगर पालीका हद्दीतील दिव्यांग बांधवांना सानुग्रह अनुदान निधीचे वाटप दरवर्षी करण्यात येते यावर्षी मात्र नाममात्र २ हजार रुपये दिव्यांग बांधवांना वाटपासाठी न.प.ने ठरविले माजी नगराध्यक्ष स्व . रवींद्र पवार असतांना कोरोना काळात स्थानिक स्वराज्य स्वंस्थेच उत्पन्ना कमी असतांना ३ हजार रुपये निधीचे वाटप दिव्यांगांना करण्यात आले होते असेही भाजपाने नमूद केले २ हजार रुपयांमध्ये वाढ करून ५००० रुपये दिव्यांग बांधवांना देण्यात येण्याची मागणी चांदूरबाजार भाजपाने निवेदन देऊन न.पा. प्रशासनाला केली. भाजपा तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, ता. सरचिटणीस गोपाल तिरमारे, गजानन सोळंके, राज चव्हाण, विजय मोहड सह आधी कार्यकर्ते उपस्थित होते.