सावरगांव येथील शंकर पटात दोन दिवसात धावल्या 238 जोड्या

0
523
Google search engine
Google search engine

सावरगाव प्रतिनिधी—- ग्रामीण भागातील शंकर पटाला मागील वर्षापासून राज्यात सुरुवात झाली.आज द9/4/2023 व 10/4//2023 ला नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे शंकर पटाची परंपरा कायम ठेवत शंकर पट कमेटी वर्ष 1 ले सावरगांव द्वारे दोन दिवसीय शंकर पटाचे आयोजन ललीत शा.रेवतकर यांचे शेतात करण्यात आले होते,
या ठिकाणी काटोल नरखेड तालुका गटामध्ये 112. शोपल्ला गटामध्ये 40 व आमजनरल गटामध्ये 86 अश्या एकूण 238 बैलजोड्या धावल्या.आज अनेक नामांकित नागपूर ,यवतमाळ, वाशिम,होशंगाबाद,बैतुल,शिवणी जिल्ह्यातील बैलजोड्या सावरगांव येथे शंकर पटात देरेदाखल झाल्या होत्या.दोन दिवस मिळून 238 बैल जोड्या सावरगाव येथे धावल्या.मागील वर्षीपासून सुरु झालेल्या शंकर पटा मध्ये शेतकऱ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता.आज शंकर पटाचा शेवटचा दिवस होता.अनेक नामांकित जोड्या आज येथे धावल्या.यात महिला धुरकरी , धुरकरी यांना उत्कृष्ट बक्षीस व शिल्ड देण्यात आले.
प्रफुल हवाले, उकेश चव्हाण उपाध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा, जगन्नाथजी मेंटागळे माजी सरपंच,सौ पार्वताबाई गुणवंत काळबांडे सदस्या जिल्हा परिषद नागपूर,कु, प्रगती ताई ढोणे सरपंच, सुरेश गोडबोले, जयपाल बेलखडे आर्वी विधानसभा क्षेत्र प्रमुख, यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रकाश रेवतकर, प्रा,धनराजजी राऊत, पुरुषोत्तम बोडखे सामाजिक कार्यकर्ता, गुणवत्ता काळबांडे,रवि दाढे शंकर पट कमेटि अध्यक्ष उपस्थित होते.


आज शंकर पटाचे बक्षीस वितरण समारंभ व समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी आशिष देशमुख माजी आमदार, डॉ. पोद्दार साहेब कळमेश्वर,
उकेश चव्हाण नागपूर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा चे अध्यक्ष संदीप सरोदे, मनोज कोरडे, शामराव बारई भाजपा, मनिष फुके,सौ मिनाक्षी संदीप सरोदे जिल्हा परिषद सदस्या नागपूर,सौ पार्वताबाई गुणवंत काळबांडे सदस्या जिल्हा परिषद नागपूर,कु प्रगती ताई ढोणे सरपंच,प्रा, धनराजजी राऊत, जगन्नाथ मेंटागळे,प्रा.ठोंबरे,शंकर पट कमेटिचे राहुल रेवतकर, गौरव रेवतकर, चंद्रशेखर काळबांडे ,ईश्वर ठोंबरे , पंकज मेंटागळे, एकनाथ रेवतकर, दिलीप तांदळे, सतिश बालपांडे, रविंद्र दाढे ,संदीप बालपांडे ,सतीश रेवतकर, चंद्रशेखर काळबांडे ,जयंत दाढे, रविंदादा बारई, छत्रपाल राऊत, नंदू मोवाडे सरपंच, लंकेश काळबांडे, कल्पेश काळबांडे, यांचे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
आज आमजनरल गटात प्रथम साहेबराव पाटील,संगमहिवरा (यवतमाळ) यांची जोडी (5.52 सेकंद),दृतीय आशिष वर्मा,वाशीम यांची जोडी (5.52सेकंद),तृतीय भाऊसाहेब जाधव साजेगांव (यवतमाळ)यांची जोडी (5.55 सेकंद) घेऊन क्रमांक मध्ये आल्या तर शोपल्ला गटामध्ये प्रथम शिवानी विजय राठोड दगडथड(यवतमाळ) यांची जोडी (5.49सेकंद) दृतीय साहेबराव पाटील संगमहिवरा यवतमाळ,(5.55सेकंद) तृतीय रामप्रसाद राठोड बैतुल यांची जोडी (5.58सेकंद)घेऊन क्रमांक मध्ये आल्या, तालुका काटोल नरखेड गटामध्ये प्रथम समीर पठाण सावरगाव (6.14सेकंद), द्वितीय भाऊसाहेब पवार उमठा (6.14 सेकंद) तृतीय क्रमांक मुरलीधर बारई सावरगाव (6.15 सेकंद) क्रमांक मध्ये आल्या, सेकंद घडीवाले उल्लास दाभाडे बुलढाणा, महिला धुरकरी सिमाबाई पाटील ज्ञानगंगापूर, आयोजनासाठी शंकर पट कमेटिचे सुरेश हिरुडकर, सुनील रेवतकर, हुसेन, जीवन रेवतकर, शेख, अंबादास झाडे, विजय पाटील, एकनाथ रेवतकर, दिलीप तांदळे, परमानंद ढोणे, मंगेश गाण, राहुल रेवतकर,मौजु पठाण, निंबाजी गवळी, रामराव रेवतकर, गौरव रेवतकर, गुणवत्ता काळबांडे, आयुष्य दाढे, देविदास धांडे, अंकुश इंगोले, भैय्या बेलखडे, जितेंद्र कावडकर, प्रफुल शेळके, विवेक गावंडे, हेमंत बालपांडे, व कमेटि सदस्य आदींनी सहकार्य केले.संचालन रविंदादा बारई, यांनी केले.
या ठिकाणी जयपाल गिरासे पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन नरखेड , पोलिस चौकी सावरगाव पोलिस कर्मचारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला, तर प्राथमिक आरोग्य केंद्र,सावरगांव च्या वतीने आरोग्य व्यवस्था सांभाळली आहे.

नामवंत बैलजोड्यांचे नाव भैरव-लक्षा, संगमहिवरा, बजरंग -राणा, वाशिम, रणवीर -बादशा, साजेगांव,हिरा -राणा दगडथड, सुलतान -टिकली बैतुल, बगल्या-विर सावरगाव,हिरा-चिल्या उमठा, येथे धावल्या.