अमरावती वरून पुण्याला जायला आता आणखी एक नवीन गाडी ; पुणे – भुसावळ एक्सप्रेस आता अमरावतीपर्यंत धावणार

0
1831

गेल्या काही महिन्यांपासून भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस (Bhusawal-Pune Hutatma Express) गाडी ही इगतपुरीपर्यंत रेल्वे लाईनच्या कामामुळे धावत होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी पाहता हुतात्मा एक्स्प्रेस ही अमरावतीपर्यंत नेण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे. ही गाडी आता पुणे- अमरावती हुतात्मा एक्स्प्रेस म्हणून असणार आहे.

प्रवाशांना भुसावळमार्गे पुणे येथे जाण्यासाठी रेल्वेगाड्या कमी आहेत. पुणे-भुसावळ पनवेलमार्गे धावणारी हुतात्मा एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता. परंतु ही गाडी अनेकदा रेल्वे तांत्रिक कामामुळे बंद अथवा ठराविक मार्गापर्यंत धावत होती. मध्य रेल्वेने आता या गाडीचा शेवटचा थांबा भुसावळऐवजी अमरावती केला आहे.

मात्र ही गाडी आता नाशिक कल्याण पनवेल मार्गे न धावता आता अहमदनगर, दौंड मार्गे धावणार आहे. यामुळे काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. खान्देशातुन नाशिक -कल्याण -पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. शैक्षणिक, व्यावसायिक कारणासाठी भुसावळ जळगावसह परिसरातून प्रवास करणारे अनेक जण आहेत. मात्र अनेक महिन्यांपासून भुसावळ-नाशिक-पुणे एक्सप्रेस बंद आहे. ती इगतपुरीपर्यंत धावत आहे. आधी या गाडीला रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता.

मात्र आता गाडी क्रमांक 11025/11026 पुणे – भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेस आता पुणे – अमरावती पुणे असा विस्तार रेल्वे बोर्डाकडून मंजूर झाला. ही गाडी दौंड मार्गे वळवली असून ती आता पनवेल, कल्याण, नाशिक रोडमार्गे न धावता आता दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरामार्गे अमरावती अशी धावणार आहे.