टेंभू योजनेचे पाणी त्वरित सोडावे या माणीसाठी तहसिलदार यांना दिले निवेदन*

*टेंभू योजनेचे पाणी त्वरित सोडावे

 

 

 

 

कडेगाव प्रतिनिधी : 10 नोव्हेंबर 2023 पासून टेंभू योजनेचे पाणी कडेगाव शहर व तालुक्यात सोडावे अशी मागणी चे निवेदन कडेगाव शहरातील व तालुक्यातील शेतकर्‍यांनी तहसिलदार श्री अजित शेलार यांना दिले. यावेळी प्रमुख उपस्थितीत डी. एस. देशमुख, श्री सुरेशचंद्र थोरात, श्री विजय शिंदे, मनोज मिसाळ, श्री आनंदराव रासकर, सागर सकटे, मोहन माळी, प्रदीप देसाई, अभिमन्यू वरूडे, आनंदराव डांगे, सागर सुर्यवंशी, दादासाहेब माळी व अनेक मान्यवर शेतकरी उपस्थित होते. कडेगाव तालुक्यात अनेक दिवसांपासून पाऊस पडला नाही. शासनाने मध्यम दुष्काळ जाहीर केला आहे. कडेगाव तालुक्यातील विहिरी कोरडय़ा पडल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. येत्या 10 नोव्हेंबर 2023 पासून टेंभू योजनेचे पाणी सोडले नाही तर कडेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे व पशुपक्षी यांचे पाण्याविना हाल होतील व
आलेली पिके, वाळून जातील. तसेच टेंभू योजनेचे पाणी तात्काळ सोडले नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन शेतकरी, व नागरिक करणार आहेत असे निवेदनात म्हटले आहे.