अमरावती ब्रेकिंग :- बियाणी चौकात भीषण अपघात ; टिप्परच्या धडकेत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी

0
7883

अमरावती :-

आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन राजापेठ येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका कोठेवार हे आपल्या ऍक्टिवा MH27 BN 4714 ने  ड्युटीवर जात असताना त्यांचा बियाणी चौकात ट्रकने धडक दिल्यामुळे त्यांचा भीषण अपघात झाला आहे त्यात त्याचा पायाला गंभीर दुखापत झाली आहे  त्या तपोवन कडून बियाणी चौक मार्गे राजपेठ कडे जात होत्या  त्यांना तात्काळ लाहोटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले , घटनेची माहिती मिळताच मा.पोलीस आयुक्त , पोलीस उपायुक्त  यांनी दवाखाण्याला भेट दिली .

सदर ट्रक चालक व ट्रक पोलीस स्टेशन ला आणण्यात आला आहे