रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर कारवाई करा- नारायण(काका) वाघमोडे यांची मागणी

0
161

रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर कारवाई करा- नारायण(काका) वाघमोडे यांची मागण

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

चालू वर्षीचा(सन 2023-24)चा ऊस गळीत हंगाम सूरु झाला असून ऊस वाहतूक करणार्या बहुतेक ट्रॉलीना नंबर प्लेट नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याच बरोबर सदर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी मागून येणाऱ्या वाहनांना सदरील ऊसाने भरलेली ट्रॉली दिसत नाही आणि यामूळे अपघात होण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत.
त्यामूळे सदर वाहनांना रिफ्लेक्टर व नंबर प्लेट बसवावेत.
वाहनांना रिफ्लेक्टर नसने, वाहनात अतिरिक्त वजन असने,ट्रॅक्टर चालकाने दारू पिऊन मोठ्या आवाजात गाणी लावून वाहन चालवणे, जादा स्पीड अशा कारणानी आजपर्यंत बरेच अपघात झाल्याचे लक्षात घेऊन वरिल गोष्टीस प्रतिबंध घालण्यासाठी आपण कठोर पावले उचलावीत.
संबंधित कारखाने व वाहनचालकांवर आपण कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन कडेगांव पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर साहेब, यांना नारायण वाघमोडे (समन्वयक पलुस कडेगांव)यांनी भारत राष्ट्र समिती (BRS)च्या वतीने देण्यात आले.
यावेळी .घनशाम महाडीक,(समन्वयक बी.आर.एस.कडेगांव) दिपक कोळी,.परशुराम माळी(शेतकरी संघटना), संतोष जगताप आदी उपस्थित होते.