सावरगांव येथे शिवपुराण महोत्सवाची सांगता

0
164
Google search engine
Google search engine

सावरगांव:- सावरगाव येथील हरिपाठ मंडळ श्री शंकर मंदिर सावरगांव यांचे वतीने श्री शंकर मंदिर,सावरगांव येथे 40 व्या वर्षानिमित्त संगीतमय शिवपुराण महोत्सवाचे तसेच ज्ञानेश्वरी पारायण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा समारोप आज शोभायात्रा काढून तसेच कीर्तनाने व महाप्रसादाचे वाटप करून करण्यात आला.
शिवपुराण महोत्सव 28 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाला त्याची सांगता मंगळवार दि. 5 डिसेंबरला 2023 ला झाली.यावेळी दररोज दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत दीदी माँ साध्वी अर्पिता मानस भारतीजी (वनदेवी आश्रम तीनखेडा ) यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय शिवपुराण कथा वाचनाचा लाभ सावरगावातील नागरिकांनी घेतला.यावेळी सात दिवस विविध नामवंत महाराजांचे कीर्तन झाले तसेच हरिपाठ,भारूड व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन असा भरगच्च कार्यक्रम होता.सप्ताह मध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आज 5 डिसेंबर-2023 रोज मंगळवारला सकाळी 8:00 वाजता संपूर्ण गावात देवाच्या पालखीची व देव शिव पुराण ग्रंथाची शोभायात्रा काढण्यात आली.यामध्ये गावातील व बाहेर गावातील भजन मंडळ, दिंड्या,बॅण्ड पथक,गावकरी यांचा सहभाग होता.सावरगावात संत मंडळी आल्याने गावकरीही आनंदात होते. या अनुषंगाने शोभायात्रा ज्या मार्गाने गेली तिथे त्याठिकाणी स्वागत करण्यात आले.शोभा यात्रेत सहभागी सर्व भक्तांसाठी दूध,नाश्ता,चहा,सरबत, हल्वा व पाण्याची व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीने ठिकठिकाणी करण्यात आली होती.
शोभायात्रा परत मंदिरात आल्यानंतर दुपारी 1:00 वाजता ह.भ.प.श्री.पद्माकर महाराज देशमुख यांनी काल्याचे कीर्तन केले व पश्चात महाप्रसाद वितरण करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा वानखेडे,कार्याध्यक्ष ओंकार काळबांडे,सचिव संजय खोडे,कोषाध्यक्ष गंगाधर देऊळकर,उपाध्यक्ष दिवाकर बोदड,सहसचिव रुपेश बारई,सदस्य पुंडलिक माहुलकर,गणेश बांगडे,नाना मेटांगळे,गौरव रेवतकर,अजाबराव रेवतकर, गुलाबराव काळबांडे तथा हरिपाठ मंडळ श्री.शंकर मंदिर,सावरगांव यांनी परिश्रम घेतले.