*मतमोजणी प्रक्रियेसाठी लोकशाही भवन सज्ज*

0
1009
Google search engine
Google search engine

 

*अमरावती दि . ३ (जिमाका) :*
०७ -अमरावती लोकसभा मतदारसंघतील मतमोजणी उद्या, मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही भवन येथे सामान्य निरीक्षक सी.जी . रजनीकांथांन, मतमोजणी निरीक्षक श्रीमती अंजना पंडा, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे , सागर पाटील, जिल्हा उप निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी आज येथील मतमोजणीच्या विविध टप्प्यातील कामाचे नियोजन , सुरक्षा व्यवस्था, माध्यम कक्ष तसेच अन्य कक्षांची पाहणी करुन मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधितांना निर्देश दिलेत .
*****-