गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावी हजारो भाविक भक्तांनी घेतले श्रींचे दर्शन

41

गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावी हजारो भाविक भक्तांनी घेतले श्रींचे दर्शन
शेगाव:- आज दिनांक २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा  तिथीला राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींचे दर्शन घेतले.

हिंदू धर्मियांमध्ये धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गुरुपौर्णिमा तिथीला गुरुची आराधना करण्यात येते श्री संत गजानन महाराजांना गुरु मानणाऱ्या हजारो भाविकांनी आज रविवार २१ जुलै रोजी श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या चरणी नतमस्तक झाले.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आराध्य दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता हजारो भाविक शेकडो किलोमीटर अंतर पायी चालून श्रींच्या मंदिरात पोहोचले होते श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानच्यावतीने भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये भक्तांच्या सेवेसाठी शेकडो सेवाधारी सेवा देत आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त श्रींच्या दर्शना करिता मंदिरात आलेल्या शेकडो भाविकांनी पारायण हॉलमध्ये सहा ते सात तास बसून श्री दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायण केले.तर मलकापूर येथील दीड हजार भाविकांनी गुरुपौर्णिमा निमित्ताने पायदळ वारीत सहभागी होऊन आज रविवार रोजी भाविक गण गण गणात बोते चार मंत्रोच्चार,टाळ मृदुंगाच्या गजर,करीत भाविक सहभागी झाले आहे.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यातील भाविक गुरुच्या दर्शनसाठी विविध धार्मिक ठिकाणी जातात त्यातील शिर्डी येथील श्री साँईबाबा, कारजा लाड येथील श्री दत्त मंदिर ,अकलकोट येथील श्री स्वामी समर्थ तर शेगांव येथील श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेतात.या सर्व ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी दिसत आहे.