काँग्रेस उमेदवार यांची लाडू तुला
शेगांव शहरात काँग्रेसची प्रचारात आघाडी
शेगांव :- जळगाव जामोद मतदार संघामध्ये येत असणाऱ्या शेगांव शहरात काँग्रेसच्या प्रचार रॅलीला सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य देखील पाहायला मिळाले. काल संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान काँग्रेस पक्षाची प्रचार रॅली धनगर नगर येथून निघाली. रॅली जसजशी पुढे जात होती तसतशी रॅलीला नागरिकांचा सहभाग वाढत असल्याचे दिसत होते. माळीपुरा परिसरात रॅली पोहचताच अनेक नागरिकांनी फटाके आणि पुष्प वृष्टी करीत उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांचे स्वागत केले. तर अनेक महिलांनी त्यांचे ओक्षन केले आणि आशीर्वाद दिला. परिसरात रॅलीचे आगमन होताच दिवाळी साजरी होत असल्याचा भास उपस्थितांना होत होता. या प्रचार रॅलीचे आकर्षण म्हणजे महविकास आघाडी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांची रॅली दरम्यान लाडू तुला ठरली. त्यावेळी युवावर्ग बुलडोझरवर बसून आपले समर्थन देत असल्याचे पाहायला मिळाले. शहरातील मुस्लिम वस्तीतून रॅली जात असताना अनेक नागरिकांनी उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांचे पुष्पगुच्छ व पुष्पहारांनी स्वागत केले. पूर्ण प्रचार रॅली दरम्यान महविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती.