आयशर आणि पिकअपच्या धडकेत तिघांचा मृत्यू तर काही जण जखमी झाल्याची घटना वरुड तालुक्यातील बेनोडा (शहीद) पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमरावती रोडवरील लाखारा फाट्यानजीक रात्री ९ वाजताचे सुमारास घडली. या अपघातात अचलपूर येथील दोन तर पांढरघाटी येथील एकाचा मृत्यू झाल्याचे कळते आहे विदर्भ24न्यूज
प्राप्त माहीतीनुसार, रात्री ९ वाजताचे सुमारास एम.एच. ३७एक्स ३०७५ क्रमांकाचा आयशर ट्रक वरुड येथून अचलपूरकडे तर एम.एच.२७ बीएक्स ९१७१ क्रमांकाचा पिक अप वाहन मोर्शी कडून वरूडकडे जात असतांना बेनोडा (शहीद) पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अमरावती रोडवरील लाखारा फाट्यानजीक अचानक दोन्ही वाहन अनियंत्रीत व भरधाव वेगात एकमेकांसमोर धडकले. ही धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहनातील तीन मजुरांचा मृत्यू तर सहा गंभीर जखमी तर काही किरकोळ जखमी झोले. यामध्ये राजेश रमेशराव युवनाते २० रा. पांढरघाटी ता. वरुड, तौफीक शहा फारूख शहा ३२ रा. रायपुरा अचलपुर आणि शेख नाजिम शेख साबीर ४० रा. बिलासपुरा अचल यांचा मृत्यू झाला. तर यातील मोहम्मद नासीर मोहम्मद साबीर ४५, मोहम्मदनिसार मोहम मतीन ३८, मोहम्मद कैसर मोहम्मद मतीन ४५ तिन्ही रा. अचलपुर यांना पुढील उपचारा नागपूर येथे रवाना करण्यात आले. तर मोहम्मद आबीद ४९, मोहम्मद मुजाहीद २५ अ मोहम्मद अरशद २८ सर्व रा. अचलपुर , यांचेवर वरूड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.