पानटपरी वाल्याची मुलगी बनली फौजी
शेगाव :— स्थानिक मोदीनगर येथे राहणारे भूमिहीन असलेले पानपट्टी हा व्यवसाय चालवणारे बळीराम थूकेकर यांच्या मुलीने अत्यंत गरिबी व हालाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेत सी. टी. एस .एफ (CTSF)टॉप इंडियन सेक्युरिटी फोर्स यामध्ये फौजी म्हणून कांचन बळीराम थूकेकर यांनी आपलं स्थान प्राप्त केला आहे. त्यामुळे मोदीनगर वासियाल तर्फे चेतन राऊत यांनी घरी जाऊन सत्कार सुद्धा केला कुमारी कांचन बळीराम थूकेकर हीने बारावी पर्यंतचे शिक्षण शेगाव मधील इंदिरा गांधी हायस्कूल ( मुनिसिपल) मध्ये केले तर बीएससी मायक्रोबायोलॉजी चे शिक्षण बुरुंगले महाविद्यालयातून पूर्ण करीत बीएससी मायक्रोबायोलॉजी मधून पदवी प्राप्त केली आहे. सहा महिन्यापूर्वी अमरावती येथे परीक्षा दिली होती त्यानंतर तिच्या पास होऊन ग्राउंड मेडिकल हे लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाले व आता पंधरा डिसेंबर रोजी तिला पत्र आलेले आहे ती लवकरच ट्रेनिंग करिता जाणार असल्याची माहिती बळीराम थुकेकर यांनी विदर्भ २४ न्यूज ला दिली बळीराम थूकेकर यांना मुलगा नाही दोन मुलीच आहे व त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे अशा परिस्थिती ही त्यांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार देत शिकवलं व आज देशाच्या सेवेसाठी पाठवत आहे यामुळे मोदीनगर सह परिसरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे.
बकऱ्या चारणारा ही झाला फौजी….
मनात जिद्द व चिकाटी आणि काही करण्याचा शुद्ध हेतू असल्यास ध्येयप्राप्ती करता येते हे सिद्ध करून दाखवील कालखेड येथील गणेश मधुकर गुरव या युवकांनी वडील मधुकर गुरव हे शेती काम व गोट फार्म चालवतात अत्यंत हलकीची परिस्थितीत आपल्या मुलाला प्रशिक्षण पूर्ण केलं व गणेश सुद्धा वडिलांच्या मदत म्हणून बकऱ्या चारायचा त्यातच त्यांनी BSF मध्ये हे यश प्राप्त केलं. गणेश यांनी मार्च महिन्यात बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स या पदाकरिता लेखी परीक्षा दिली होती व त्यात घवघवीत यश प्राप्त करी त्याचेही बीएसएफ मध्ये सिलेक्शन होत ग्राउंड व मेडिकल हे लातूर येथे झाले होते आता त्याला शिपाई पदाकरिता कॉल आलेला आहे व तो लवकरच देशाच्या सेवेत रुजू होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रतिनिधीला दिली.