शिवप्रभु विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात
भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात सावित्रीबाईंनी महत्त्वाची भूमिका बजावली : वैष्णवी पुजारी
सांगली/ कडेगाव न्युज:
जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलीत श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालयात कडेगांवच्या नायब तहसिलदार वैष्णवी पुजारी व पुरवठा विभागाच्या नायब तहसिलदार त्रिवेणी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सावत्रिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन महसुल विभागाच्या नायब तहसिलदार वैष्णवी पुजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना वैष्णवी पुजारी म्हणाल्या, सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.
कार्यक्रमादरम्यान, नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी आणि त्रिवेणी गुरव यांचा शाल, श्रीफळ, व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे, त्रिवेणी गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रविण कदम यांनी तर आभार प्रा.लाटे सर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेचे सदस्य वसंत इनामदार, मुख्याध्यापिका मनिषा पवार यांचेसह शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी यावेळी उपस्थित हो त.