ब्राह्मण महासंघ पर्यावरण रक्षक…

279
Oplus_131072
  1. विठ्ठल मिरगे पर्यावरण अभ्यासक
    शेगाव :- दि१२जानेवारी
    प्रयागराज येथे सुरू झालेल्या कुंभमेळ्यात पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतुने राष्ट्रीय स्वयंसेवक च्या प्रेरणेतून पर्यावरण संरक्षण गतिविधी विदर्भ प्रांत व भारतीय उत्कर्ष मंडळ खापरी च्या संयुक्त विद्यमाने राबवीण्यात येत असलेल्या थैला आणि थाली अभियानात अ भा ब्राह्मण महासंघाने मोलाचे योगदान दिले आहे त्यामुळे ब्राह्मण महासंघ पर्यावरण रक्षक आहे असे पर्यावरणचे गाढे अभ्यासक राज्यपाल पुरस्कार प्राप्त विठ्ठल मिरगे सर यांनी म्हटले आहे.
    मकरसंक्रांत पौष क्रुष्ण प्रतीप्रदा ते महाशिवरात्र माघ क्रुष्ण त्रयोदशी सन 2025च्या महा कुंभ मेळाव्यात उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 45 कोटी भक्त भेट देण्याची शक्यता आहे त्यामुळे या परिसरात प्रत्येक दिवशी 1200 टन कचरा तयार होईल आणि मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी व संपूर्ण निसर्गाची हानी होण्याची शक्यता आहे ही गोष्ट लक्षात घेऊन वरील संघटनांनी पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने दृष्टीने थाली आणि थैला प्रत्येक भक्ताला देण्याची योजना आखली आहे याकरिता किमान शंभर रुपयात एक खाली व एक थैला दानस्वरुपात देण्याची योजना आहे त्यामुळे सर्व सुज्ञ नागरिकांना आव्हान करून त्यातून हा निधी उभारण्याची योजना केली व या निधीतून 45कोटि भक्तांना थाली आणि थैला देण्याची योजना अम्मंलात येत आहे
    योजनेला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेगाव शाखेने अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणावर निधी एकत्रित करून तो एकत्रीत झालेला व रा स्व संघ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत दिलेल्या अँपरुन या योजने करीता आँनलाईन सुपूर्त करण्यात आला
    यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह आशिष पांडे व जिल्हा पर्यावरण अभ्यासक व प्रमुख विठ्ठल मिरगे सर यांच्या उपस्थितीत हा ब्राह्मण महासंघाने संकलित केलेला निधी सुपूर्त करण्यात आला यावेळेस बोलताना विठ्ठल मिरगे यांनी या संकल्पनेविषयीची विस्तृत माहिती दिली आपण जर पत्रावळ्या व युज अँन्ड थ्रो चे ग्लास या भक्तांना दिले तर दररोज 1200 टन कचरा जमा होईल व पॉलिथिन बॅग मुळे, कॅरीबॅगमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होईल ती हानी कशी वाचवता येईल याचा संपूर्ण अभ्यास करून या कुंभमेळ्यात येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला एक शैली आणि एक थाळी देऊन मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी वाचवता येईल व अस्वच्छता होण्यापासून वाचवता येईल त्यामुळे 45 कोटी भक्तांना ही थाली व एक थैली प्रत्येकी देण्याची योजना अमलात येत असून त्यासाठी संपूर्ण नियोजन झालेले आहे यामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेगावच्या वतीने केलेले योगदान मोठे असून ब्राह्मण समाज हा पर्यावरण रक्षक आहेच हे त्यांनी सिद्ध केल्याचे म्हटले आहे तसेच शेगाव शहरातील ब्राह्मण महासंघ हा सर्वच सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असल्याचे गेले दहा ते बारा वर्षापासून सर्वांना माहीत असल्यामुळे या समाजाने सर्व समाजाला योग्य दिशा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे व इतर समाजाने या समाजाच्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण करण्याचेही आवाहन केले आहे.
    रामरक्षा स्तोत्र १३वेळा पठण
    आयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीरामांची मुर्तीची प्राणप्रतिष्ठा मागिल वर्षी षौष तीथी नुसार त्या एकवर्ष पुर्ण झाले त्यामुळे अ भा ब्राह्मण महासंघ व श्रीरामभक्तांच्या वतीने आनंदसागर जवळील प्रल्हाद महाराजा प्रणीत श्रीराम मंदिरात येथे श्री रामरक्षा स्तोत्र चे 13 वेळा पठण करण्यात आले व मारुती स्तोत्र पठण करण्याच आले यावेळी अंजली जोशी अँड. प्रदिप जोशी, प्रविण धर्माधिकारी, अंजली देशपांडे, मंजुषा कुळकर्णी, विजय जगधन, वंदना धर्माधिकारी,वर्षा महाजन, अनिता शर्मा, रेणुका जोशी, अंजु पांडे, अनघा सराफ, दिपा दंडवते, विजय बल्लाळ,भुषण महाजन, ईत्यादि सह पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते