4
Oplus_131072

37 वी मुले व 33 वी मुली वरिष्ठ राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत

महाराष्ट्र मुले व पॉंडेचरी मुलीनी मारली बाजी

शेगांव : 37 व्या पुरुष व 33 व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी तर पॉंडेचरी च्या मुलींनी बाजी मारली आहे.
3 ते 5 जानेवारी रोजी येथील शिवबा मैदानावर सदरची स्पर्धा पार पडली. ह्या स्पर्धेत हरयाना, केरळ, मध्यप्रदेश, बिहार, तेलंगना, महाराष्ट्रासह 22 राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. समारोपीय कार्यक्रमात विजेत्या चमुला कप व बक्षीस देतेवेळी विधानपरिषदेचे आ.धीरज लिंगाडे, माऊली शिक्षण संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेस राज्यकारणीचे वरिष्ठ नेते रामविजय बुरुंगले, ग्रामीण पोस्टेचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे, सेवादलचे अनिल सावळे, समाज सेवक काँगेस नेते दिपक सलामपुरिया, पत्रकार अनिल उंबरकर, कविता राजवैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर केरळच्या मुलांच्या व मुलींच्या चमुने बाजी मारली तसेच तिसरे बक्षीस मुलामधून कर्नाटक व पॉंडेचरी टीमने सामूहिक जिंकला आहे. तर मुलींमंधून 3 रे बक्षीस महाराष्ट्र व तामिळनाडूच्या चमुने सामूहिकरित्या बक्षीस जिंकले आहे. सदर कार्यक्रमाला भारतीय आटयापाट्या फेडरेशनचे सचिव डॉ.दीपक कवीश्वर, भारतीय आट्या पाट्या फेडरेशन सीईओ जय कवीश्वर युवराज, महाराष्ट्र महामंडळाचे सचिव डॉ.अमरकांत चकोले उपस्थित होते.
ह्यावेळी शहरातील खेळप्रेमी नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती. सदर स्पर्धेकरिता गेल्या काही दिवसापासून शहरातील आट्यापाट्या टीमने अथक परिश्रम घेतले. ह्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील हौशी आटपाट्या असोसिएशनचे वैभव दाभाडे, भूषण दाभाडे, मोनू देशपांडे, प्रसाद सातव, महेश पहूरकर, पवन डांबलकर, सागर डांबरे, भगवान लोंढे यांचीही विशेष उपस्थिती होती. खेळाडुंना मार्गदर्शन व प्रोत्साहन अमर खराटे, गजानन पैकट यांचा लाभला.

आट्यापाट्या खेळाला येणाऱ्या अधिवेशनात मुद्दा उचलून विधानपरिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीयस्तरावर 5% आरक्षण मिळवून देईल. ज्यामुळे शासकीय स्तरावर ह्या खेळाडूंना नोकरी व शिक्षणामध्ये नक्कीच फायदा होईल व खेळाडूंचे मनोबल उंचावेल असे उदगार विधानपरिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांनी यावेळी खेळाडूंना उद्देशून काढले.