शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी नंदूभाऊ कुलकर्णी तर सचिव नितीन घरडे
शेगाव : मराठी पत्रकार परिषद संलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाचे नूतन अध्यक्षपदी नंदूभाऊ कुलकर्णी दै. तरूण भारत तर सचिव पदी नितीन घरडे दै. देशोन्नती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांचे मार्गदर्शनात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत यांच्या आदेशाने शेगाव तालुका पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष व सचिवाची निवड जाहिर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह राजपूत यांनी शेगाव तालुका पत्रकार संघाच्या उपक्रमांबद्दल कौतुकही केले.तालुकास्तरावरील पत्रकारांचाही पोस्टाचा विमा काढून घेण्याचे आवाहन केले.तसेच तालुकास्तरावरील पत्रकारांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह राजपूत यांनी डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर,जिल्हा पदाधिकारी राजेश चौधरी,धनराज ससाने,नारायण दाभाडे,संजय त्रिवेदी,आदींशी चर्चेदरम्यान दिली.
शेगाव तालुका पत्रकार संघाची उर्वरित कार्यकारणी अध्यक्ष नंदुभाऊ कुळकर्णी जाहीर करतील.