पत्रकार संघाटनेचे तिन्ही अध्यक्ष एकापेक्षा “एक”
शेगाव :- काही दिवस अगोदर शेगावातील प्रमुख महत्वपूर्ण पत्रकार संघाटनेच्या तिन्ही अध्यक्षांचा एकत्र चर्चेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यांचे एकत्र आल्याने तिघे अध्यक्ष आता काय नवीन शेगावला देतात? यावर अनेक पत्रकारांमध्ये, राजकारणी व्यक्तींमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
६ जानेवारी हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी प्रत्येक पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या आदर्शवर चालून त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करत असतो अशी तो मनात इच्छाही बाळगतो कारण बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारांचे आराध्य आहेत
पत्रकार मंडळींच्या संघटनांमध्ये या दिवसाच्या औचीत्याने काही बदल व्हायला सुरुवात होतात जसे संघटनेचे अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या होतात आणि मात्र हे बदल एक महिना पर्यंत चालतात आणि त्या संघटनेच्या नावाखाली पदाधिकारी आपले नाव मिरवण्याचा प्रकार घडतो, संघटनांमध्ये आपली संघटना सगळ्यात वरचढ असा दाखवण्याचा मानस असतो मात्र या विपरित शेगाव मधील संघटनांमध्ये समजास्याची भावना दिसून येते. शेगावात तीन प्रमुख संघटना आहेत पहिली संघटना म्हणजे शेगाव प्रेस क्लब र.नं. 2206 या प्रेस क्लबचे अध्यक्ष महेंद्रकुमार मिश्रा* जे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये माघील 18 वर्षापासून कार्यरत असून विविध कार्यक्रमांमधून निर्भीडपणे अधिकारी, राजकारणी, सामाजिक बाबींवर विश्लेषण विविध ठिकाणाहून लोकांमध्ये चर्चा करून निवडणुकीचा सटीक एक्झिट पोल, बातमीची सखोल माहिती आणि सुंदर अशा आध्यात्मिक बातम्यांचा एकमेव चेहरा म्हणजे महेंद्र मिश्रा म्हणून शहरात प्रसिध्द आहेत.
तर दुसरी संघटना म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया
या संघटनेचे अध्यक्ष म्हणून नानाराव पाटील कार्यरत आहेत जे शेगावात “शोध पत्रकार” म्हणून ओळखले जातात. सुवाच्च, सुस्पष्ट आणि यथोचित सखोल सलग बातमीच्या खोलवर जाऊन संपूर्ण बातमीचा लेखाजोखा जमा करून फक्त जनतेसमोर आणण्याचं कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
तसेच तिसरी प्रमुख पत्रकार संघटनेचे शहरांमध्ये एक वेगळं स्थान आणि महत्त्व आहे
ती म्हणजे तालुका पत्रकार संघ या पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदू कुलकर्णी आहेत यांच्या बाबत असे म्हणतात की, त्यांच्या खिशाला असलेला पेन हा त्यांचा दागिना आहे. या लेखणीची धुराच नंदू कुलकर्णी यांच्या हातात आहे मागील वीस वर्षापासून शेगाव तालुक्यामध्ये आपल्या लेखणी द्वारे अनेकांची कैफियत मांडणारे म्हणून आजही लोकांमध्ये परिचित आहे.
एक टिव्ही कॅमेराचा धनी, एक शोध पत्रकारितेचा धनी तर एक लेखणीचा धनी
अशी ही तिन्ही अध्यक्षांची ख्याती आहे.
आपण सामंजस्य, एकोपा जपणारे आणि कार्यवाही शैली आपल्या कामांमधून सिद्ध करणारे तिन्ही अध्यक्षांकडून शेगाव शहराला नवीन वर्षात नवीन अपेक्षा जडलेल्या आहेत एवढं मात्र नक्की.