अतिक्रमण धारकाकडून गजानन महाराजांच्या भक्ताला मारहाण

155

अतिक्रमण धारकाकडून गजानन महाराजांच्या भक्ताला मारहाण

*पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई*
# परिसर कायम अतिक्रमण मुक्त व्हावा भक्तांची मागणी

शेगाव —- संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगाव येथे भाविकांची गर्दी पाहता रस्त्याचे दुभाजीकरण करण्यात आले की जेणेकरून भक्तांना व गावकऱ्यांना कुठले त्रास होऊ नये आणि कुठली घटना घडू नये यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला व आराखडा पूर्ण करण्यात आला परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहुजी वस्ताद चौक येथे अतिक्रमण धारकाने खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून ठेवण्यात आले होते नगरपरिषद फक्त आयुक्त साहेब आले तर अतिक्रमण काढायचे नंतर स्थानिक जनप्रतिनिधी यांच्या दाबाखाली येऊन परत त्यांना बसण्याची मूकसंमती देण्यात यायची का? बहुतेक नगरपरिषद काहीतरी होण्याची वाट बघत होती का? असा प्रश्न निर्माण होत आहे व तसे आज घडले भाविकांचे जीव जाता जाता वाचला
दिनांक २८/१/२०२५ रोजी गजानन महाराज मंदिरासमोर भाविकांना मारण्यात आले या अगोदरही असे बरेच प्रकार घडले परंतु त्याची एवढी दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे अतिक्रमण धारकांची हिम्मत वाढत जाऊन आज जीवे मारण्यापर्यंत गेली परंतु वेळीच आज पोलीस प्रशासनाचे कर्तव्यदक्ष ठाणेदार नितीन पाटील यांनी कड्क कारवाईचा करीत सर्वत्र अतिक्रमण काढली स्थानिक मंदिर परिसर समोर अतिक्रमणामुळे भक्तांना साधे चालता सुद्धा येत नाही त्यामुळे अनेक वेळा भक्तांना धक्के खात जाव लागते व यातून वाद उभे राहतात त्यातील आज अकोला येथील रहिवासी शुभम जगदीश श्रीवास यांना कुटुंबासह अतिक्रमणधारक दुकानदाराने मारहाण केली असता पोलीस प्रशासनाकडून ताबडतोब कडक कारवाई करत मंदिर परिसर अतिक्रमण धारकांवर कारवाई करत पुर्ण परीसर मोकळे केलेआहे.
या कारवाईमध्ये गावकऱ्यांनी पोलिसांची प्रशंशा केली व परत हे अतिक्रमण बसू नये यासाठी सूचना देखील केल्या पोलीस प्रशासन व शेगाव नगरपरिषद यांनी कोण्या मोठ्या नेत्याच्या व जनप्रतिनिधीच्या म्हणून्या नुसार अतिक्रमण परत जैसे थे दुकाना बसतात अशी चर्चा शेगाव शहरात होत आहे.

तरी याची दक्षता नगर परिषद शेगाव यांनी घ्यावी.