रेल्वेत गोंधळ करणारी ती महिला अखेर शेगाव आरपीएफ च्या ताब्यात
शेगाव:- सविस्तर वृत्त असे की 07 एप्रिल रोजी ट्रेन मध्ये एक बुरखाधारी महिलेने विदर्भ एक्सप्रेस मध्ये टीसी, रेल्वे कर्मचारी यांना जेरीस आणून एसी डब्ब्यात अनधिकृत यात्रींच्या सीटवर बसून बरीच धांदल घातली होती तसेच पेंट्री कार च्या कर्मचाऱ्यांवर हात सुद्धा उगारला होता तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन मी कोण आहे ते विचारा असे बोलणारी अज्ञात महिलेचा विडिओ भारतभर वायरल झाला होता याबद्दल या अज्ञात महिले विरुद्ध आरपीएफ शेगाव येथे अपराध क्र 161/2025 कलम 145 ब,146 रेल्वे अधिनियम नुसार गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून त्या अज्ञात महिलेच्या मागावर आरपीएफ च्या अनेक टीम लागल्या होत्या पण दिनांक 05 मे रोजी आरपीएफ अकोला चे निरीक्षक श्री लक्ष्मण यादव यांना वरील महिला मडगाव एक्सप्रेस मध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली यावरून त्यांनी जी सूचना शेगाव चे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना दिल्यावरून रंजन तेलंग यांनी शहर पोलीस च्या महिला आरक्षक चारुशीला गवई, रंजना ताठर, जीआरपी च्या महिला आरक्षक माया,तसेच आरपीएफ च्या निकिता तेलगोटे यांच्या मदतीने सापळा रचून त्या महिलेला कोच S-5 कोच मधून त्या महिलेला ताब्यात घेतले, तिच्या विरुद्ध दाखल गुन्हा जमानतीय असल्याने नोटीस देऊन तिला कोर्टात राहण्याची समज दिली गेली ,तसेच तिने पुन्हा असे कृत्य करू नये यासाठी तिला समज देऊन तिच्या गावी जाऊन नातेवाईकांच्या ताब्यात दिले गेले. या प्रकरणात रंजन तेलंग यांनी मोलाची कामगिरी बजावली यामुळे आरपीएफ शेगाव चे कार्य पुन्हा प्रकाशझोतात आले.






