#ठेकेदाराला मोकळी सूट
#आभाल ,वृद्ध , व महिलांचे बेहाल
शेगाव:- संत नगरी शेगाव मधील नगरपरिषद ची हद्द वाढ झाल्यानंतर रोकडिया नगर मधील उर्वरित भागाचा विकास कामासाठी शासनाकडून भरपूर प्रमाणात निधी देण्यात आला परंतु या निधीचा अधिकारी योग्य प्रकारे वापर करतो आहे का? याकडे कोणाचे लक्ष नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधीने यावर लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी होत आहे .
रोकडिया नगर मध्ये दुर्गा चौक ते सांप्रदाय या मुख्य रस्त्यावर कामे होत असताना अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा मुख्य रस्ता असून यावरून दररोज आपल्या कामावर जाणाऱ्या महिला पुरुष तसेच क्लासेस साठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. हा भाग काळया मातीचा असल्यामुळे इथे वाहने मोठ्या प्रमानात घसरत आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची माहिती नगरपरिषद मधील, बांधकाम अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना दिली असता त्यांनी कुठल्याच प्रकारचे प्राथमिक व्यवस्था सुद्धा केलेली नाही. येथे मुरूम न टाकता चुरी टाकून प्राथमिक रस्ता दुरुस्त केल्या जाऊ शकतो परंतु याकडे संबंधित बांधकाम अधिकाऱ्याने फारच दुर्लक्ष केले आहे कदाचित कुणाचा तरी अपघात व्हावा त्यानंतर बातमी लागावी मगच आम्ही काही तरी उपाय करू?
असं चित्र समोर दिसत आहे या ठिकाणी “एखादा मोठा अपघात होण्याची अधिकारी वाट तर पाहत नाही ना” असं आता नागरिकांना वाटत आहे. इतर विकास काम करत असताना ठेकेदार किंवा काम करणाऱ्या मजुरांसोबत नगर परिषदचा संबंधित कुठल्याही अधिकारी व कर्मचारी हजर नसतो. ठेकेदार दादांना खुली सूट दिलेली दिसते त्यामुळे काम खरच मोजमाप होत आहे का ?हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
या रस्त्याला लवकरात लवकर चालना मिळावी व योग्य दुरुस्ती व्हावी हे मागणी येथील जनता करीत आहे. कारण भविष्यात येथे कुठला छोटा मोठा अपघात झाला तर याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद व संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांची राहील अशी येथील रहिवाशी उघडपणे सांगत आहे या सर्व गोष्टीवर तात्काळ वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज






