स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या !!…किशोर मिश्रा यांची मागणी
शेगाव : दि 29मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी प्रचंड हालपिष्ट सहन केल्या त्यांच्या परिवाराने सुद्धा प्रचंड हाल अपेष्टा,कष्ट सहन केल्या व काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान निकोबार येथे 27 वर्ष भोगली त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाची बरोबरी कोणीही करणार नाही त्यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करायला पाहिजे असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष किशोर मिश्रा यांनी केले आहे
दिनांक 28 मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त शेगाव येथील सुधा कॉर्टर परीसरात भारतीय जनता पक्ष आणि अ भा ब्राह्मण महासंघाच्या वतीने संयुक्त झालेल्या सावरकर अभिवादन कार्यक्रम प्रसंग ते बोलत होते ते म्हणाले की 26 वर्ष नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या देशासाठी कारावास भोगला तर भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले परंतु सावरकरांनी आपल्याच देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये स्वतःच्या सोबत कुटुंबाची आहुती दिली परंतु त्यांना अद्याप पर्यंत भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही ही खेदाची बाब आहे असे मिश्रा म्हणाले
सावरकरांचा विरोध करणाऱ्याला सडेतोड उत्तर द्या!!
प्रदीप सांगळे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अतिशय कष्ट बघून सेल्युलर जेलमध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या त्या अत्यंत वेदनादायी प्रचंड कष्टमय आयुष्यात सुद्धा त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ज्योत देवत ठेवली प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचेवर आताचे विरोधक टीका करतात अशा बिन बुडाच्या टीका करणाऱ्या विरोधकांवर तुटून पडून त्यांचा खरपूस समाचार घेऊन सावरकरांच्या विरुद्ध बोलणाऱ्याला त्यांच्याच भाषेत समजेल असे सडेतोड उत्तर द्या असे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदीप सांगळे यांनी म्हटले आहे.
सावरकर प्रखर हिंदुत्ववादी….
भूषण महाजन अखंड भारताचे स्वप्न आयुष्यभर सतत उराशी बाळगुन त्यासाठी अथक प्रयत्न करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते व सर्व हिंदूंनी आपसातील मतभेद विसरून जातीभेद विसरून वर्ण व्यवस्था विसरून देशाच्या भवितव्यासाठी व मानव जातीच्या भवितव्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे म्हटले होते व त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पूर्णतः खर्ची घातले होते दलितांना घरी स्वतःच्या पंक्तीमध्ये जेवायला बसवून त्या काळात त्यांनी असाहि विचार करून समाज संघटित करण्याचे काम अथक केलेले आहे त्यांच्या विचारांची देशाला व हिंदू धर्माला सतत गरज आहे आपण कौटुबीक चौकटीच्या बाहेर जाऊन समाजाचा, धर्माचा ,आणि देशाचा विचार केला पाहिजे. देशाच्या अखंडतेसाठी सावरकरांचे विचार सतत लोकांपर्यंत अत्यंत जागरूकपणे पोहोचले पाहिजे नव्या पिढीला वाचाव्याला दिला पाहिजे जहाल क्रांतिकारी विचारांच्या भरोशावरच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे नवीन पिढीला पटवून सांगण्यात आले पाहिजे असेही भूषण महाजन म्हणाले.
यावेळी अध्यक्षस्थानी भाजप चे शेगाव शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे होते यावेळी पणत्या मधे दिवेलाऊन पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाला विजय जगधन,राजेश अग्रवाल, सचिन ढमाळ, विवेक सराफ, नंदु शेगोकार, अनिल उंबरकार, अनंता भरडे, विवेक सराफ, चेतना खेते ,आरती वैद्यताई चिन्मय धर्माधिकारी प्रविण धर्माधिकारी ,सागर आमले हर्षद चासकर, मनोज काशीकर, मनोज कायंदे, पुरुषोत्तम दंडवते,नितीन कराळे, उखाजी राखोंडे, चारुदत्त चव्हाण,राजूअंबुस्कर यांचे सह सावरकर प्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन नंदुभाऊ कुळकर्णी यांनी केले आभारप्रदर्शन पुरूषोत्तम हाडोळे यांनी केले.