Uncategorized

पत्रकारांसाठी ऑपरेशन कवच कुंडल राबविणार – नानाराव पाटील

# व्हॉइस ऑफ मीडियाकडून विमान अपघातातील नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली
शेगाव : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांचे जीवन अतिशय कष्टाचे आहे अशा वेळेस त्यांना व त्यांच्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी संतनगरी शेगावातील पत्रकारांसाठी ऑपरेशन कवच कुंडल राबविणार असल्याची घोषणा व्हाईस ऑफ मीडियाचे शेगाव तालुका अध्यक्ष नानाराव पाटील यांनी केले.
व्हाईस ऑफ मीडियाची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक १३जून शुक्रवारी शेगाव येथील विश्राम भवनात पार पडली. त्यावेळी सर्वप्रथम अहमदाबाद मधील झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू पडलेल्या नागरिकांना व्हाईस ऑफ मीडिया शेगाव तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली व त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णाजी सपकाळ यांच्या मार्गदर्शनात व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रवक्ते फहीम देशमुख आणि जिल्हा संघटक अमर बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुकाध्यक्ष नानाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत नानाराव पाटील यांनी पत्रकारांसाठी विमा कवच व त्यांच्या परिवाराचा आरोग्य बाबत. महत्त्वपूर्ण भूमिका घेतली या बैठकीमध्ये पत्रकारांच्या विविध असलेल्या समस्यांवर चर्चा करून निकाली काढण्यात आल्या. याशिवाय संतनगरी शेगाव व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्या जंगी सत्काराचे आयोजन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
या बैठकीला व्हॉइस ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष दिनेश महाजन, कार्याध्यक्ष महेंद्र मिश्रा, उपाध्यक्ष सतीश अग्रवाल ,सचिव ज्ञानेश्वर ताकोते , संजय ठाकूर राजवर्धन शेगोकार, प्रकाश उन्हाळे, समीर देशमुख, दिनेश घाटोळ, विठ्ठल अवताडे ,प्रा. रोहित देशमुख, मंगेश पाटील यांच्या सह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.