रस्त्यासाठी विद्यानगर, गोविंद नगर, लक्ष्मी नगर, लक्षदीप नगर वाशीयांचे मुख्याधिकारी यांना निवेदन .
शेगाव :– स्थानिक रोकडिया नगर भागातील काशेलानी पेट्रोल पंप मागील विद्यानगर ,गोविंद नगर, लक्ष्मी नगर व लक्षदीप नगर तसेच जवळील परिसरात अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सुरू केल्यामुळे या भागातील पक्के डांबरी रस्ते पूर्ण खोदून ड्रेनेजचे काम केले गेले ज्यामुळे परिसरामध्ये रस्त्यावर काळया मातीचे ढीग साठलेले असल्याने लहान ,मोठ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना हा मोठा त्रास सहन करावा लागत असून त्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करीत चालण्यायोग्य करणे साठी परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर यांना निवेदन दिले
सध्या .पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे या भागांमध्ये मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही .शाळेत जाणारी मुले, दवाखान्यात जाणारे रुग्ण, महिला तसेच परिसरातील नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी नगरपरिषद प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर नगरातील रस्त्यांचे तात्काळ खडीकरण करून रस्ता पूर्ववत सुरू करावा व काही दिवसातच पक्का डांबरी रस्ता करून द्यावा अशी मागणी नगरवासीयांनी केली आहे. सदर बाबीचे निवेदन वर नगरातील रहिवाशी शिवाजी निळे ,रतन गाडेकर ,ज्ञानेश्वर खेडकर ,नारायण वानखडे, रामेश्वर पाटील, पुंजाजी वानखडे, नितीन डहाके ,अनंत वऱ्हाडे ,प्रभाकर माळी ,हरीश पालीवाल, अनिल अग्रवाल, नरहरी पाटील ,स्वप्निल शेळके ,शेखर धाराशिवकर ,देवीलाल पालीवाल ,ज्ञानेश्वर बारबदे ,टी व्ही वानखडे, अनिल पाटील, सुभाष तेटवार, ओम काळे, विष्णू निळे, संतोष मस्के ,नेहा मस्के, संतोष चिंचोलकार, महादेव निळे, हर्षल बोदडे, रूपाली पाटील , अक्षरानंद येवडदेकर, जगदीश राठी, प्रवीण घाटे, ठाकूर मॅडम, राजेश साहेब, सोपान गावंडे, कमलसिंह परिहार,अनिल अळने यांच्या सहीने उपमुख्याधिकारी राजवर्धन पाटील नगरपरिषद शेगाव यांना निवेदन सादर केले
कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते, जनप्रतिनिधी कुठलाही पुढाकार घेत नसल्याची नागरिकांची खंत!
स्थानिक रोकडिया नगर व त्या भागातील अनेक समस्या असून सर्वात महत्त्वाची रस्त्याची समस्या असून पावसाळ्यात पायी चालणे कठीण झाले आहे याकरिता या आधी सुद्धा आम्ही नागरिकांनी सांगितले, निवेदन दिले अनेक वेळा रस्त्याच्या बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या असल्या तरी पाहिजे तशी सुधारणा झाली नसून ड्रेनेज च्या नावाने पूर्ण रोड खोदल्या जातो यावर सध्या कोणताही राजकीय पक्ष व नेता समस्येबाबत पुढाकार घेत नसल्याची खंत! यावेळी स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली हे विशेष.