नागपूर वरून मुंबई कडे जाणाऱ्या मालगाडी चे कपलिंग बोरगाव मंजू जवळ तुटल्याने अनेक गाड्या लेट
अकोला : देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस म्हणून गेल्याच आठवड्यात सुरू झालेल्या नागपूर-पुणे वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 12 तास प्रवास करणारी ही एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला गतीमान पद्धतीने जोडत आहे. मात्र, अकोला (Akola) जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर नागपूर-पुणे वंदे भारत (Vande bharat) एक्सप्रेस आज तब्बल 2 तास उभी राहिली होती. येथे मालगाडीचा खोळंबा झाल्याने वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांची मोठी तारांबळ झाली असून तब्बल 2 तास उशिराने ही एक्सप्रेस आता पुढे धावत आहे. तर, ज्या रेल्वे स्थानकावर वंदे भारतला थांबा नाही, त्या रेल्वे स्थानकावर तब्बल 2 तास ही ट्रेन उभी होती.






