Uncategorized

सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार — आदरणीय किरणबाप्पू देशमुख

सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार — आदरणीय किरणबाप्पू देशमुख
समाज जीवनातील आशेचे ‘ किरण’
@ दूरदृष्टी ठेवणारे तेजोमय “किरण ‘

शेगाव: संतनगरी शेगावचे सुपुत्र,नागरिक हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक व काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आदरणीय किरणबाप्पू देशमुख हे नाव आज शेगावच्या सामाजिक, शैक्षणिक,राजकीय व सांस्कृतिक इतिहासात एक उजळलेले पान बनले आहे. आपल्या कार्यातून त्यांनी गावाच्या विकासाला परिवर्तनाचे नवे आयाम दिले आहेत. आपल्या खेळाडू वृत्तीने युवकांच्या मनाला गवसणी घालणारे बाप्पु साहेब यांनी *क्रीडानगरी ते संतनगरी असे न भूतो न भविष्यता भव्य ‘ हॉलीबॉल’ चे सामने घेतले* तसेच *भीषण दुष्काळाच्या काळात प्रभागातील नागरिकांना टँकरद्वारे घरपोच पाण्याची व्यवस्था करीत त्यांची तुषना भागवली* अशा कार्या करिता किरणबाप्पू यांनी शेगावच्या विकासासाठी अविरत संघर्ष केला. *ना.ह.स.च्या माध्यमातून रेल्वे गाड्यांना शेगावात थांबा मिळावा, तसेच सरकारी दवाखान्यातील सुविधा* सुधाराव्यात यासाठी त्यांनी आंदोलन करीत लढे उभारले, उपोषणं केली, आणि त्यासाठी वेळोवेळी संपूर्ण शेगाव बंद पाडून नागरिकांच्या मनात एकजुटीचा जागर निर्माण केला. हे आंदोलन म्हणजे फक्त विकासाची मागणी नव्हे, तर गावाच्या भवितव्याची चिंता करणाऱ्या एका खरा नेता व समाजसेवकाचे प्रतिबिंब होते.
भारत जोडो यात्रा दरम्यान आदरणीय खा. राहुल गांधी यांची शेगावमधील ऐतिहासिक सभा लाखोच्या जनसागरासमोर पार पडली, त्या भव्य दिव्य सभेचे नेतृत्व आणि बहारदार सूत्रसंचालन करण्याचा सन्मान किरण बाप्पूंना लाभला. हा क्षण त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय ठरला.
केवळ राजकारण नव्हे, तर समाजसेवा,समाज हित , सामाजिक परिवर्तन हाच किरण बाप्पूंच्या जीवनाचा खरा गाभा आहे. *आपल्या प्रभागातील स्मशानभूमीच्या विकासाचे स्वप्न त्यांनी “सोमेश्वर धाम’ च्या माध्यमातून साकारले* — जे आज सौंदर्य व शिस्त यांचा संगम असलेले एक आदर्श मॉडेल ठरले आहे. *अग्नीदानासाठी मोफत लाकडांची व्यवस्था आणि मोफत स्वर्गरथ* ही सेवा शेगावात एकमेव व आदर्शव्रत ठरली आहे.
पर्यावरणाचे रक्षण, संस्कृतीचे जतन आणि तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने त्यांनी गत दोन वर्षे पासून शेगावात *डीजे मुक्त, संस्कारी उत्सवांची संकल्पना राबवली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरे होणारे गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सव आणि कावड यात्रा यासाठी त्यांनी *”शेगावचा मानाचा गणराया” आणि “आई भवानी पुरस्कार” सुरू केला*. हे कार्य स्वतःपुर्त मर्यादित न ठेवता गाव सहभागातून सुरू करून गावातील तरुणांना हा उपक्रम संस्कार आणि सेवा याची प्रेरणा देतो आहे.
२०२५ पासून या उपक्रमाची व्याप्ती वाढवून ‘युवा क्रांती’, ‘गो ग्रीन’, ‘पतंजली योग समिती’, ‘ना.ह.स.’ व ‘मोतीबाग मंडळ’ या प्रतिष्ठित संस्था मध्ये समाविष्ट करून चांगल्या विचाराचे परिवर्तन बीज रोपण केल्या गेले आहेत. येणाऱ्या काळात याचे सकारात्मक उत्तम फलित सर्वांसमोर येईलच
किरणबाप्पू देशमुख हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व ,अभ्यासू, संकल्पशील आणि परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्वाचे धनी असून
“*समाज जीवनातील अनेकांच्या आशेचे किरण.’….,* एवढेच नाही तर

“सर्वत्र दूरदृष्टी ठेवणारे तेजोमय किरण”….अशा त्यांच्या अष्टपैलू कार्यामुळे शेगावचे नाव राज्यपातळीवर झळकले आहे. आज ते केवळ शेगावकरांचे नेते नाहीत, तर ते जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले एक समाजदूत असणारे आमच्या सर्वांचे *आधारस्तंभ* असलेले आदरणीय किरणदादा आपणास *वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*🌹💐🌹💐 आपलं कार्य ,कर्तृत्व शब्दात मांडणे शक्य नाही माझ्या अल्प बुद्धी ने आपल्या अफाट कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

अशा संघर्ष योध्याला मानाचा मुजरा आई भवानी कृपेने बाप्पूना उदंड, निरोगी व दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून सातत्यपूर्ण समाज सेवा घडो हीच शेगावीचा राणा संत गजानन चरणी प्रार्थना* व आमच्या विदर्भ 24 न्यूज परिवार कडून आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.