Uncategorized

“८ दिवसात तोडगा नाही तर थेट हायकोर्ट सोनी मोहोड यांचा नगरपरिषदेला इशारा “

 *शेगाव नगर परिषदेच्या कामकाजावर उभे राहिलं प्रश्नचिन्ह*

मुख्याधिकारी यांची ताबडतोब बदली करावी – जनतेची मागणी

शेगाव : संत नगरी शेगाव मध्ये नागरिकांचे मूलभूत समस्या नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत वारंवार निवेदन अर्ज करून त्रस्त झालेल्या एका सामान्य व्यक्तीने आज थेट नगरपरिषदेला हायकोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे तर आपण जाणून घेऊया ही व्यक्ती कोण? सोनु मोहोड हे मागील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष यांच्याकडून प्रभागांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उभे होते अवघ्या काही ८ते९ मतांनी यांचा पराभव झाला परंतु ते भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि आपल्या प्रभागातील जनतेच्या समस्यांना नेहमी न्याय देण्याचे काम करीत राहतात. जर केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना त्याच्या सच्चा कार्यकर्त्याला नगरपरिषदेला कामाबद्दल इशारा देण्याची वेळ येत आहे तर ही “शोकांतिका नव्हे का?” मग सामान्य माणसाचा काय होत असेल? शेगाव शहरात व्यंकटेश नगर, जगदंबा नगर, श्रीकृष्ण नगर आणि टेकडी परिसर या भागात कष्टकरी, शेतकरी, हात मजूर असे लोक वास्तव्याला आहे या भागातील जनता आता संतापाच्या टोकाला पोहोचलेली आहे.
यासाठी समस्या सोडवा अन्यथा मी स्वतःउच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असा इशारा सोनू मोहोड यांनी अर्जमार्फत नगर परिषदेला दिलेला आहे.

यापूर्वी असे अनेक निवेदन शेगाव शहरातील समस्या असलेल्या भागातील लोकांनी नगरपरिषद तथा विविध माध्यमे, वृत्तपञ, बातमी या माध्यमातून नगर परिषदे चे मुख्याधिकारी पर्यंत पोहोचले आहे परंतु त्याचा काहीही परिणाम मुख्याधिकारी यांच्यावर पडलेला दिसून आलेला नाही मग अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली व्हावी अशी जनतेची इच्छा आहे. योग्य व कामाला न्याय देणारा मुख्याधिकारी आम्हाला हवा?
समस्याची यादी मोठी झाली आहे याचे कारण कामचुकारपणा विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी आपल्या कामांमध्ये दुर्लक्ष करीत आहे याचे कारण “सह्या कोतवाल तो दर काहे का?” यामुळेच समस्यांची यादी काम न झाल्यामुळे वाढतच आहे. यामध्ये स्वच्छता असो रस्ते असो महामार्ग मध्ये अडथळा निर्माण करणारी इलेक्ट्रिक पोल असो गटार योजना पूर्णतः अयशस्वी ठरली असून त्यामधून तुडुंब घान पाणी रस्त्यावर येत आहे व त्यामुळे तेथील परिसरातील सामान्य जनतेच्या आरोग्यला धोका उद्भवत आहे.

“जन प्रतिनिधी काय करीत आहे- जनतेचा प्रश्न”?नगरपरिषदेच्या निवडणुका कोळंबल्यामुळे तेथे अद्याप कुठलाही नगरसेवक नाही आहे परंतु सध्या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार डॉक्टर संजय कुटे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहे की ज्यांना कर्मयोद्धा,जल योद्धा, असे अनेक कामामुळे त्यांची चांगली ख्याती आहे.परंतु एवढ्या समस्या असूनही आमदार साहेब झोपले आहेत का? असा प्रश्न जनतेच्या मनात उभा राहिला आहे की, का ते अशा अधिकाऱ्यांवर, मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांची बदली का करत नाही? यामध्ये काही गुळ रहस्य आहे कारण जनतेला एवढा त्रास होत असताना सुद्धा आमदार साहेब गप्प का आहेत? मागील काळात ठेकेदारांना कामाबद्दल बजावत त्यांची कान उघडणे केली परंतु काही फरक पडलेला दिसून येत नाही ठेकेदारांचा नुसता मनमानी कारभार सुरू आहे खरंच यावर आमदार साहेब काय बोलणार आहेत की नाही?

“सुरू असलेल्या कामामधील ठेकेदार नेमके कोण”? शेगाव नगर परिषदेची हद्द वाढ झालेल्या भागामध्ये विविध प्रकारची कामे सुरू आहेत व त्याची ठेकेदारी हि कुणाकडे तर खासदार व आमदार यांच्या निकटवर्तीय असलेल्या लोकांच्या नातेवाईकांकडे या सर्व कामांची ठेकेदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ते संबंधित कुठल्याच अधिकारांचे ऐकत नसून स्वतःचा मनमानी कारभार सुरू आहे त्यामुळे सुद्धा या समस्या उद्भवलेले आहेत.अशा अनेक कारणांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे परंतु यांच्याकडे कुणाचेच लक्ष केंद्रित झालेले नाही यामुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार येत असेल तर याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न समोर उद्भवणारआहे. प्रशासनाला निष्क्रिय कामामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे प्रलंबित कामे दर्जाहीन, आरोग्याला धोका या तिहेरी संकटातून नागरिक त्रस्त झाले आहेत प्रशासन मात्र अद्यापही मौन बाळगून असल्याने संत नगरीत रस्त्यावर उतरण्याची व आंदोलन करण्याची शक्यता दिसून येत आहे.

नागरिकांचा एकच नारा तातडीचा तोडगा काढा नाहीतर न्यायालयत भेटा!