न.प.व नाहस समितीच्या वतीने ‘ अटलघन वन ‘ ची निर्मिती
नाहस व मोतीबाग तालीम यांची संवर्धनाची जबाबदारी
शेगाव:– शेगाव नगरपरिषद च्या माध्यमातून केंद्र शासनाच्या अटल घनवनचा संकल्प घेतला असता तो संकल्प पूर्णत्वासनेत शेगाव नगर परिषद व नागरिक हक्क संरक्षण समिती आणि मोतीबाग तालीम मंडळाच्या वतीने ‘ अटल घनवन ‘ ची निर्मिती संतनगरीत करण्यात आली.
दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गौलखेड रोडवरील डम्पिंग ग्राउंड च्या भव्य परिसरातील खुल्या जागेत नगर परिषद च्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर व नाहसचे संस्थापक अध्यक्ष किरणबाप्पू देशमुख आणि युवा क्रांती संघटनेचे विजय यादव, सुलताने काका यांच्या हस्ते या ठिकाणी अटल घनवन च्या निर्मिती एक हजार वृक्ष लिंबाचे एकाच वेळी तयार केलेल्या खड्ड्यात लावण्यात आले यावेळी उपस्थित न.प.चे उपमुख्यअधिकारी राजवर्धन पाटील ,आशिष जोशी, माणिकराव पाटील ,राजेंद्र डांगे ,नाना इंगळे वैभव वरणकर, महेश जंगले,संजय इंगळे ,अंकुश उमाळे ,आकाश इंगळे, शेखर खराटे ,आशिष गावंडे तसेच नाहसचे प्रा. निकुंज देशमुख, उमेश देशमुख ,रतनसिंग ठाकूर, महेश देशमुख सह मोठ्या प्रमाणात नाहस व मोतीबाग तालीम चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तीन वर्षानंतर याच ठिकाणी वनभोजन:– किरणबाप्पू देशमुख*
सदर अटल वनची संकल्पना ही मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर मॅडमची असून त्यांच्या सोबत चर्चा करताना त्यांनी म्हटले अशा कामाकरिता संघटनेने समोर यावे या दृष्टीने मी आमच्या ना.ह.स. व मोतीबाग तालीम मधील मुलांसोबत चर्चा करून एकाच वेळी १००० झाडे लावून त्याची संपूर्ण संवर्धनाची जबाबदारी आम्ही स्वीकारली व शहराला शुद्ध ऑक्सिजन करिता या ठिकाणी कडुलिंबाची निवड करून लावली आपले गाव आपली जबाबदारी समजून सर्व झाडे जगविणे व परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्याचा आम्ही संकल्प घेतला असून आजच्या तीन वर्षानंतर याच ठिकाणी अटल घण वनच्या छायेत वनभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी काटकर मॅडम यांनी यावे अशी विनंती सुद्धा यावेळी नाहसचे संस्थापक अध्यक्ष किरणबाप्पू देशमुख यांनी केली.
शुद्ध हवेसाठी हरितक्रांती आवश्यक:– मुख्याधिकारी.डॉ.काटकर
एकाच ठिकाणी अनेक झाडे लावल्याने शहराला शुद्ध हवा मिळेल व नागरिकांच्या आरोग्यासाठी हे झाडे फुफुसाचे कार्य करील या उद्देशाने न. प. व ना.ह.स. च्या माध्यमातून येथे एक हजार झाडे लावून त्याला जगवण्याचे कार्य करणार असून नागरिकांनीही झाडे लावून ते जगवावे जेणेकरून शुद्ध हवेसाठी हरित क्रांती होईल असे आव्हान यावेळी न. प.मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर (बोराडे )यांनी केले*






