आसुरी शक्ति वर दैवी शक्तिचा विजय मह्णजे विजयादशमी उत्सव
अरविंदजी कुकडे
शेगांव: आसुरी शक्ति वर दैवी शक्तिचा विजयम्हणजे उत्सव म्हणजे विजयादशमी असे संघाचे विदर्भ प्रांताचे सहसंपर्क प्रमुख वक्ते अरविंद कुकडे यांनी म्हटले आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शेगांव शाखेचा १००व्वा विजयादशमी उत्सव श्रीराम नगर येथे दि ५अक्टोंबर२०२५रोजी साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की १००वर्षाच्या वाटचाल म्हणजे खुप मोठा टप्पा आहे अनेक पिढ्यांनी संघाचे संस्कार परीवारात रुजवले संघविचारांच्या विरोधात मोठ्या संखेने असुन सुध्दा सत्याच्या आधारावर डॉ हेडगेवारांनी देशाला जगात सर्व श्रेष्ठ करण्यासाठी अनेकांना त्याग करायला लावुन संघ संस्कारातुन उभे केले व त्यागी स्वयंसेवकांनी देश सेवेत झोकुन दिले म्हणुन शकतकोत्तर वाटचाल हि उज्वल भविष्याची नांदि आहे.
डॉ हेडगेवारांच नांव माहिती नसलेले लोक आजहि आहेत ईतक त्यांनी व्यक्ती पेक्षा देश मोठा असा आदर्श निर्माण केला असे कुकडे म्हणाले.
1948,1975,हा आतिशय कठिण काळ संघासाठी होता रामजन्मभुमिसाठि बलीदान देऊन संघाच्या कार्यकरत्यांनी संघाचे नांव मोठे केले आणि हिंदुचा पाठिंबा मिळवला आज फक्त समाजाचे दोष दुर करण्यासाठी प्रयत्न करा देश अस्थीर करण्यासाठी होणारे प्रयत्न हाणुन पाडा त्यासाठी संघासोबत समाजाने उभे राहण्याची गरज आहे ईथल खाऊन या देशाच वाईट व्हाव असा विचार करणारा एक गट ईथे आहे पण संघटित हिंदु हा सगळा प्रयोग हाणुन पाडला आहे
कुटुंब वाचवा सुसंस्कृत करा जातीजातीत भांडण मिटवावे लागतील आपसातील वैमनस्य मिटवा संघटित रहा देश सुरक्षीत करा असे आवाहन त्यांनी केले
यावेळी प्रमुख अततीथी बसंत पांडे म्हणाले की, राष्ट्राय स्वा: म्हणत सतत स्वची आहुती देऊन स्वयंसेवक देशासाठी उभे राहिले संघाने टोकाचा
विरोध सहन केला मधला काळ सहमतीस होता आता ठिकठिकाणी संघाचे स्वागत होत आहे संघाने भारत मातेला परमवैभवाला नेणे हे एकमेव उध्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवले आहे
व्यक्ति निर्माण ते राष्ट्र निर्माण हे कार्य निरंतर सुरू आहे सर्व राष्ट्रीय संकटात स्वयंसेवक समाजाच्या सेवेत सतत पुढे आहे भारत जगात सर्व श्रेष्ठ होणारच
यावेळी मंचावर तालुका संघचालक श्रीरामजी पुंडे,नगर संघचालक शामसुंदर तेल्हारकर हे उपस्थीत होते
पथसंचलन नगर परीक्रमा ध्वजारोहण, प्रार्थना, शस्त्रपूजनानंतर घोष वादन, विविध प्रकारचे प्रात्यक्षिक, सांधिक गीत, सुभाषित, अमृतवचन, वैयक्तिक गीत क्रिष्णा भगत प्रफुल्ल देशमुख अँड भुषण गोरवाडकर यांनी केले अशिष पांडे नगरकार्यवाह यांनी प्रास्ताविक केले.
या उत्सवाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
आ डॉ संजय कुटे यांनी पथसंचलनात संपुर्ण गणवेशासह सहभाग घेतला.






