जय महालक्ष्मी नवदुर्गा मंडळाचा पुढाकार
# विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी नवरात्र उत्सव
शेगाव:– यावर्षी अनेक भागात पावसाने थैमान घातलेला असून अनेक गावाचे जनजीवन विस्कळीत झाले असून पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले तसेच शेतीचे अतोनात नुकसान झाले असल्याने शासनाकडून पूर ग्रस्तांसाठी मदतीची हाक देण्यात आली असता त्या हाकेला ‘ ओ’ देत सर्वसामान्य मोदीनगर वाशियाणी सुद्धा उचलला पूरग्रस्तांसाठी खारीचा वाटा
महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्तांसाठी मदतीचे आव्हान करताच श्री संत गजानन महाराज संस्थान कडून एक कोटी अकरा लाख रुपयाचा धनादेश नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला तीच प्रेरणा मोदीनगर वाशियांनी घेत आपआपल्या परीने पूरग्रस्तांकरिता मदत गोळा केली या मदती करिता जय महालक्ष्मी मंडळाने पुढाकार घेत मोदी नगर मधील प्रत्येक गल्लीबोळात जाऊन रॅलीच्या माध्यमातून पूरग्रस्तांकरिता मदत गोळा केली. व यादरम्यान विविध नारे देत लोक जागरूकता सुद्धा केली
जमा झालेली ती मदत शेगाव तहसीलदार दीपक बाजट यांच्या मार्फत चेक द्वारे मुख्यमंत्री सहायता निधीत पाठवण्यात येणार आहे .अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली यावेळी मदत गोळा करण्यासाठी डॉक्टर रवी कराळे पत्रकार नाना पाटील तसेच मंडळाचे चैतन्य नेमाने, इंजी.गजानन ठोंबरे, ऋग्वेद चत्तरकार ,आदित्य सिंहस्ते, प्रवीण काळे, प्रणव देशमुख, साई बदाने, युवराज काळे ,श्लोक ठाकरे ,आयुष देशमुख, वेदांत नेमाने ,सह जय मा लक्ष्मी दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते व मुली आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता विविध नारे देत त्यांनी परिसर दणदणांनून टाकला
मंडळाच्या वतीने नऊ दिवस स्तुत्य उपक्रमांचा गजर
जय महालक्ष्मी नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने या नऊ दिवसात अनेक उपक्रम राबविण्यात आले सर्वप्रथम आरोग्य तपासणी शिबिर ,रक्तदान ,वृक्ष लागवड, पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करणे, संत गजानन महाराज व रुद्र महाकाली नाट्यप्रयोग ,नृत्य, स्पर्धा, सांस्कृतिक नृत्य, गरबा ,चित्रकला स्पर्धा तसेच ठाणेदार यांचे मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर प्रश्नमंजुषा, भजन संध्या ,संगीत खुर्ची, लिंबू चमचा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रम करीत मंडळाच्या वतीने नऊ दिवस तृतीय उपक्रम राबविण्यात आले हे विशेष.






