शेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ०६ मधील काँग्रेसचे उमेदवार किरणबाप्पु देशमुख आणि मंगलाताई चव्हाण यांनी आपला प्रचार शैलीतील एक नवीन मायबाप जनतेसमोर शपथपत्र सादर सादर केले व त्यामध्ये वचनपूर्ती करत शपथ घेतली की,जर आम्ही नगरसेवक झालो तर नगरपरिषद मधील कुठले कामाचे टेंडर, ठेकेदारी तथा कमिशन,टक्केवारी घेणार नाही जनतेचे विकासासाठी आलेला सर्व निधी योग्य त्या योग्य ठिकाणी व जनतेच्या सर्वांनी विकासासाठी त्या त्या भागामध्ये लावण्याची शपथ दोन्ही उमेदवारांनी लेखी स्वरूपात नोटरी करत जनतेसमोर सादर केली. सोबतच नगरपरिषद मधील कुठल्या भ्रष्टाचार, गैर व्यवहार अथवा अफरातफर मध्ये
सहभाग होणार नाही शासनाकडून आपल्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी आणून त्याचा योग्य तो सुविधा देत जनतेला त्याचा लाभ मिळून देण्यासाठी तत्पर राहील सोबत गोर गरिबासाठी शासनाकडून आलेल्या योजना त्यांना कसे पारदर्शकपणे पूर्ण करून देता येईल आम्ही प्रभागामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करू प्रभाग क्रमांक ०६ मधील हे दोन्ही उमेदवार मागील अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत असून जनतेच्या भल्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरून भरपूर अशा सुविधा जनतेला मिळून दिलेले आहेत नेहमी जनतेच्या संपर्कात राहुल तेथील लोकांची समस्या कशी सोडवता येईल यासाठी कटिबद्ध राहो याचाच एक उदाहरण म्हणून चंदाबाई प्लॉटमधील अडथळा निर्माण करणारा गड्डा मागील खूप वर्षापासून तसाच रखडलेला असतो परंतु किरणबाप्पु देशमुख यांनी तो काही तासांमध्येच शासनाकडून पूर्ण करून घेतला अशा सुशिक्षित तथा कार्यालय शैलीची माहिती असलेल्या उमेदवार असे ध्येय धोरण अतिशय घेऊन क्रमांक ०६ मधील उमेदवारांना जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे आणि त्यांनी केलेल्या कामाची चर्चा सुद्धा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणे कौतुक करत आहे.











