आपला विदर्भआपली अमरावतीताज्या घडामोडी

नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत कार्यालयात गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – नगरसेविका – सौ.प्रांजली राहुल गुल्हाने

 

नांदगाव खंडेश्वर – तालुका प्रतिनिधी

येथील नगर पंचायत कार्यालयात नागरिक आपल्या कामानिमित्य जात असता सदर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी बरेच वेळा गैरहजर असल्याचे दिसुन येतात.याबाबत जनमानसात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.आता पर्यंत नगर पंचायत कार्यालय नांदगाव खंडेश्वर हे प्रशासकाचे ताब्यात होते त्यामुळे मनमानी कारभार चालत असे आता यापुढे अस होता कामा नये
वेळेवर कार्यालयात हजर न राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तसेच अनधिकृतपणे गैरहजर राहणार्या अधिकारी कर्मचार्यांविरोधात कारवाईची करण्याची मागणी नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर असे की,
नांदगाव खंडेश्रर, नगर पंचायत कार्यालयातील काही अधिकारी कर्मचारी बरेचदा कार्यालयीन वेळेत गैरहजर असल्याचे दिसुन येतात. शासनाचे नियमानुसार कार्यालयात हजर न राहण्याच्या वृत्तीबद्दल निदर्शनास आणू देत. बरेच वेळा नागरिक आपल्या कामासाठी नगर पंचायत कार्यालयात गेले असता
काही अधिकारी कर्मचारी गैरहजर दिसुन येतात.यावरुन असे चित्र दिसुन येते की, नगर पंचायत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वारंवार कार्यालयात वेळेवर येत नाहीत अथवा बरेचवेळा रजेवर असताना पूर्वसूचना देत नाहीत. त्यांच्या या कृतीमुळे कार्यालयीन कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे.आणि शिस्त बिघडत आहे. त्यामुळे,महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार (शिस्त व अपील) १९७९ आणि संबंधित शासकीय परिपत्रकांमधील तरतुदी विचारात घेऊन नगर पंचायत नांदगाव खंडेश्वरचे कार्यक्षेत्रात येणारे अधिकारी / कर्मचारी यांच्यावर लक्ष्य देऊन कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणार्यांना समज देऊन नियमानुसार तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांनी मुख्याधिकारी यांच्या कडे एक निवेदनाव्दारे केली आहे,