आपला विदर्भआपली अमरावतीताज्या घडामोडी

*महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक मतमोजणी असल्यामुळे* *15 व 16 जानेवारीला वाहतुकीमध्ये अंशत: बदल*

अमरावती :-  महानगरपालिका अमरावती सार्वत्रिक निवडणूक-2026 मतमोजणी दि. 16 जानेवारी 2026 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख, क्रीडा व वाणिज्य संकुल, महानगरपालिका, नवसारी, अमरावती येथे सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. तत्पुर्वी दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मतदान केंद्रावरील इव्हीम मशीन, कंट्रोल युनीट इत्यादी सामुग्री घेवून येणाऱ्या वाहनांची वर्दळ मतमोजणी केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात राहणार आहे. तसेच दि. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रियेसाठी सकाळी 8 वाजेपासून संबंधित अधिकारी, उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी महानगरपालिका क्रीडा संकुल, नवसारी, अमरावती परिसरात मतमोजणीसाठी दाखल होतील.
मतमोजणी प्रक्रीयेसाठी मोठ्या संख्येने येणार शासकीय व खाजगी नागरिक यांची व वाहनांची वर्दळ लक्षात घेता मतदान केंद्र परिसरात वाहतुक कोंडी, अपघात यासारखा प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. सर्व सामान्य नागरिकांचे जीवित रक्षण व कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरासमोरील मार्गावरील वाहतुक बंद करून इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी मुंबई पोलीस कायदा तसेच मोटर वाहन कायदा अन्वये हा आदेश जारी केला आहे.
प्रवेश बंदी मार्ग- कठोरा ते छत्रपती संभाजी राजे चौक राजपूत धाबा चौक पर्यंत. कालावधी- गुरूवार दि. 15 जानेवारी 2026 चे रात्री 10 वाजेपासून शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 चे संपूर्ण मतमोजणी प्रक्रीया संपेपर्यंत राहील. याला पर्यायी मार्ग- पंचवटीकडून नवसारीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी कठोरा नाका रंगोली लॉन-कठोरा जकात नाका या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
राजपूत धाबाकडून पंचवटीकडे येणाऱ्या सर्व वाहनांनी पर्यायी मार्ग-राजपूत धाबा-रिंगरोड-पोटेपाटील चौक-कठोरा नाका फक्त किंवा राजपूत धाबा-रिंगरोड-पोटे पाटील चौक- रहाटगाव टी पॉईटं या मार्गाचा अवलंब करावा.
अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतुकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.