………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….
भातकुली च्या मानकर ढाब्यानजीक सायत फाट्याजवळ भीषण अपघात
अमरावती : भातकुली तालुक्यातील सायत येथील एका मानकर धाब्यासमोर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
भातकुली पोलिसांनी चौघांच्याही अपघाती मृत्यूला दुजोरा दिला आहे. सायत हे गाव भातकुली ते दर्यापूर मार्गावर असून दोन्ही कार भरधाव वेगामध्ये समोरासमोर धडकल्या. या भीषण धडकेमध्ये दोन्ही कारमधील चौघे जण मृत्युमुखी पडले. यातील दोघे अन्य कारमधील तर दोघे जण अमरावती पासिंगच्या कारमध्ये होते. घटनास्थळी भातकुलीचे ठाणेदार राजू राजुलवार व त्यांचे पथक पोहोचले असून गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.











