*नवे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर रूजू*

अमरावती, दि. 30 (जिमाका) : अमरावती जिल्हाधिकारी पदी आशिष येरेकर आज रूजू झाले आहे. त्यांनी रितसर जिल्हाधिकारी पदांची सूत्रे स्विकारली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. येरेकर यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, तहसिलदार विजय लोखंडे, अधिक्षक निलेश खटके आदी उपस्थित होते.
रूजू झाल्यानंतर श्री. येरेकर यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेतली.