मृतक महावितरण मध्ये उप- कार्यकारी अभियंता पदावर होते MSEB Amravati Rular Subdivision मधून विनंती बदली करून जुन्नर पुणे येथे गेले होते
कार ट्रकवर आदळल्याने एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर दाेन जण जखमी झाले़ ही घटना आज ३१ ऑक्टाेबर राेजी मलकापूर पांग्राजवळ घडली. राजेश दाभाडे (वय ४२),शुभांगी दाभाडे (वय ३२) आणि रियांश राजेश दाभाडे (वय ४) अशी मृतकांची नावे आहेत.
पुणे येथील राजेश दाभाडे यांचे कुटुंब कार क्रमांक एएमच १७ एजे ९१७३ ने अमरावतीकडे हाेत हाेते़ दरम्यान, समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक ३३४़ ६०० नागपूर काॅरीडाेअवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रक क्रमांक एमएच २१ बीएच ५९७६ वर आदळली़ ही धडक एवढी भीषण हाेती की, यामध्ये शुभांगी दाभाडे व राजेश दाभाडे हे जागीच ठार झाले़ तसेच रियांश दाभाडे या चिमुकल्याला सिंदखेड राजा येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला