शेगाव:- महाराष्ट्र मध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत या वातावरणात नेत्यांची मतदारसंघांमध्ये येण्या-जाण्याची लगबग सुरू झाली आहे.
संतनगरी शेगाव मध्ये आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले व त्यांनी सर्वप्रथम संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांचा ताफा महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्या शेगाव येथील संपर्क प्रचार कार्यालयाकडे निघाला. महाविकास आघाडीच्या उमेदवारी असलेल्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्या संपर्क प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी केले.महाराष्ट्रात जे फिरतना दिसतय तीन तिकडा काम बीगादा एका पोत्यात पाय घालून फिरतात कारण की महाराष्ट्र आता महायुतीच्या विरोधात कसा पेटला आहे हे आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितलंच आहे.
या सगळ्या चाललेल्या खोटा घोषणांचा पाऊस तुम्हाला कोणत्याच प्रकारचे पीक देणार नाही म्हणून तुम्हा विचारतोय की आपण महाराष्ट्राचे सरकार गद्दारांच्या हातात देणार की निष्ठावंतांच्या आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या विचाराचा हवा आहे की मोदी शहा अदानीचा महाराष्ट्र करायचा हे आता तुमच्या हातात आहे तुम्हाला ठरवायचा आहे त्यांच्या आगमनाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले व डॉ. स्वाती वाकेकर यांना शुभेच्छा दिल्या.