वीज चोर पुष्पावर सर्वात मोठी कारवाई ! ४९ विजचोर ग्राहकांकडून ९,९६,००० दंड वसुल, फौजदारी कारवाई मात्र नाही

चांदुर बाजार –  प्रतिनिधी :-  शशिकांत निचत

चांदूरबाजार महावितरण उपविभागातील थेट हूक टाकून वीज चोरी करणे, मीटरमध्ये फेरफार करून मीटर संथ करणे यासोबतच रिमोट कंट्रोलने वीज चोरी करून स्वत:ला स्मार्ट समजणाऱ्या वीज चोरांवर नुकतीच मोर्शी डिव्हिजन अंतर्गत येत असलेल्या चांदूरबाजार उपविभागातील कार्यकारी अभियंता श्री विजय कासट यांच्या नेतृत्वात ४९ विज चोर पुष्पांवर कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल ४९ ग्राहकांवर जवळपास ९ लाख ९६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे चांदूरबाजार उपविभागातील वीज चोर पुष्पांचे आकोडे टाकून व मीटरमध्ये फेरफार करून त्याचप्रमाणे रिमोटने वीज चोरी करून स्मार्ट समजणाऱ्या वीज चोरांचेही धाबे चांगलेच दणाणले आहे.

चांदूरबाजार शहरात मीटर संथ करणारी तसेच मीटरमध्ये रिमोट कंट्रोलची किट बसविणारी टोळी सक्रीय झाली होती. त्यामुळे शहरात स्मार्ट वीज चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे मुख्य अभियंता श्री  ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आणि अधिक्षक अभियंता श्री दीपक देवहाते यांच्या पुढाकाराने महावितरणकडून वीज चोरी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली आहे

मोर्शी डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता कार्यकारी श्री विजय कासट यांच्या मार्गदर्शनाखाली १२ पथके तयार करून चांदूरबाजार शहरात दाखल झाले त्यात मोर्शी डिव्हिजन अंतर्गत ११अभियंते व २४ कर्मचारी यांचा समावेश असून, चांदूरबाजार उपविभागातील जवळपास सर्व शाखेचे अभियंते व जवळपास ४० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. उपकार्यकारी अभियंते सहायक अभियंते त्याचप्रमाणे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वात आणि मोर्शी डिव्हिजन अंतर्गत येत असलेल्या महावितरण उपविभागाचे चांदूरबाजार चे उपकार्यकारी अभियंता श्री दिनेश भागवत यांच्या विशेष सहभागाने सुरू असलेली महावितरणची वीजचोरीची विशेष मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार. तसेच या मोहिमेत नियोजनबध्द संशयीत ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात आली

 

*या कायद्यान्वये केली जाते कारवाई*

भारतीय विद्युत कायदा २००३, सुधारित २००७ चे कलम १३५ अन्वये वीज चोरीबाबत कारवाई करून दंड ठोठावला जाते.

 

*मोहीम तीव्र करणार!*

यासंदर्भात वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री विजय कासट म्हणाले की वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध मोहीम आणखी कडक करणार असून ग्राहकांनी यावेळी विज बिल भरणा करावा विज चोरीचा प्रयत्न करू नये असे आवाहन मोर्शी डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता यांनी ग्राहकांना केले

 

एकूण बारा पथकांनी केली कारवाई

मोशी डिव्हिजन अंतर्गत येत असलेल्या चांदूरबाजार उपविभागातील ४९विज ग्राहकांवर सर्वात मोठी कारवाई केल्याचे बोलले जात आहे यात एकूण बारा पथकाचा समावेश केला होता त्या चांदूरबाजार शहरात एकूण चार पथक होते व बाकी इतर पथके सातवी शाखेत विचोरीचे कारवाई केली यात एकूण जवळपास येत असलेले ११ अभियंते व २४ टेक्नीशियन हजर होते व चांदूरबाजार उपविभागातील उपकार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे सर्व अभियंते त्याचप्रमाणे बायोस्त्रोत कर्मचारी एकूण जवळपास ७० कर्मचारी सुद्धा पथकात हजर होते ही चांदूरबाजार महावितरण उपविभागातील सर्वात मोठी कारवाई बोलल्या जात आहे.

 

* वितरणहानी कमी करण्याचे आव्हान*

महावितरण हानी कमी करण्याचे मोर्शी डिव्हिजन मध्ये मोठे आव्हान आहे. त्यामुळे वीज चोरीवर विशेष लक्ष केंद्रीत करा. वीज चोरांवरती गुन्हे दाखल करा. वीज चोरी विरोधात राबवित असलेल्या मोहिमेत सातत्य राखा. वीज चोरी हा फौजदारी गुन्हा आहे हे ग्राहकांच्या लक्षात आणून द्या. तसेच कायमस्वरूपी ग्राहकांची प्राधान्याने तपासणी करा, अनाधिकृत वीज पुरवठा आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा असे स्पष्ट निर्देश यावेळी मोर्शी डिव्हिजन चे कार्यकारी अभियंता विजय कासट यांनी सहाही उपविभागातील उपकार्यकारी अभियंता दिल्या आहे

श्री विजय कासट. –  कार्यकारी अभियंता महावितरण मोर्शी डिव्हिजन