*अचलपूर पोलिसांनी दुचाकी चोरास केले जेरबंद*

0
658
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/-

अचलपूर पोलीस स्टेशन अंतर्गत होत असलेल्या दुचाकी चो-यांच्या तपासात पोलिसांना यश प्राप्त झाले व आरोपी अटक करुन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या.
पोलीस स्टेशन अचलपुर येथे दाखल अप क्र 145/17 कलम 379 व अप 146/17 कलम 379 भादंवि प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अखेर यश आले असून आरोपी शे कलीम शे निसार अचलपुर याचेकडून दोन मोटारसायकल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली व त्याचा पीसीआर घेऊन पुढील तपास करीत आहेत या तपासात अजून काही चो-यांचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.थानेदार आधारसींह सोनोने यांचे मार्गदर्शनाखाली विनोद राउत,पुरुषोत्तम बावनेर,रवी बावने,सचिन भोंबे यांनी हा तपास करून आरोपी ला जेरबंद केले.