*महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची आज प्रचारसभा* शरदचंद्रजी पवार, उद्धव ठाकरे, मुकुल वासनिक सभेला करणार संबोधित

0
265
Google search engine
Google search engine

 

अमरावती/प्रतिनिधी

अमरावती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज (सोमवारी) महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,काँग्रेस चे महासचिव मुकुल वासनिक आज सभेला संबोधित करणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढत असून त्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. तीन दशकानंतर काँग्रेस ला या मतदार संघात उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.महाविकास आघाडी मधील सर्व घटकपक्षातील कार्यर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विजयाचा संकल्प केला असून त्याअनुषंगाने सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
सध्यस्थीत बळवंत वानखडे यांच्या विजयाची खात्री असल्याने महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.त्यामुळे दिग्गज नेते बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ अमरावती येते येत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,काँग्रेस चे महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे देखील नेते सभेला उपस्थित असतील. तरी या महासभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.