मुख्यमंत्र्याच्या दारात राजुभाऊ चौधरीच्या घुगऱ्या

0
1219
Google search engine
Google search engine





महेंद्र महाजन जैन/  रिसोड/ वाशिम –


वाशीम-

 तूर उत्पादक शेतकर्‍यांची सत्ताधारी सरकारने थट्टा मांडली आहे. शेतकर्‍यांची सर्व तूर खरेदी करण्याचे आश्‍वासन देऊनही अद्याप मोठ्याप्रमाणावर तूर खरेदी करण्यात आली नाही. या शासन धोरणाच्या निषेधार्थ वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजूभाऊ चौधरी यांनी बुधवारी (ता.14) सकाळी 10 वाजता, स्थानिक पुसद नाका येथे तुरीच्या घुगर्‍या शिजविन्याचे अभिनव आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  दारात घुगऱ्या पाठवून निषेध नोंदविला आहे
शासनाने ता. 31 मे पर्यंत तूर उत्पादक शेतकर्‍यांची सर्व तूर खरेदी करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर तुरीची खरेदी बाकीच आहे. वाशीम बाजार समितीमध्ये ता. 2 जून पर्यंत केवळ 650 शेतकर्‍यांची तूर खरेदी करता आली. तर उर्वरित 7 हजार 350 शेतकर्‍यांची तब्बल 1 लाख 50 हजार क्विंटल तूर अद्यापही शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. हे सर्व शेतकरी आजही तूर खरेदीच्या आशेवर बसून आहेत. मात्र, नाफेडद्वारे केल्या जाणार्‍या तूर खरेदीचा वेग हा कासवगतीने आहे. त्यामुळे संपूर्ण पावसाळाभरही या शेतकर्‍यांच्या तूर विक्रीचा नंबर लागणार नसल्याचे दिसून येते. वाशीम नाफेड केंद्राचे डीएमओ वाजपेयी यांनी ता. 3 जून 2017 पासून येथील केंद्रावरील तूर खरेदी बंद केली. पुन्हा खरेदी सुरू झाली. मात्र, या खरेदीचा वेग फारच मंद आहे. प्रत्येक दिवशी केवळ 40 शेतकर्‍यांची तूर मोजल्या जाते. त्यामुळे उर्वरित शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यासाठी जवळपास 7 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत शेतकर्‍यांच्या घरातील तुरीला भुंगे लागून नुकसान होणार आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यास शेतकर्‍यांसमोर घरातील तुरीच्या घुगर्‍या करून खान्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे बाजार समितीचे संचालक राजूभाऊ चौधरी यांनी बुधवारी (ता.14) तूर खरेदीबाबत शासनाच्या उदासीनतेचा निषेध व्यक्त करण्याच्या दृष्टीने तुरीच्या घुगर्‍या शिजविण्याचा अभिनव आंदोलन केले तुरीच्या घुगऱ्या मुख्यमंत्राना पाठवून निषेध नोंदवला आहे