​गणेश विसर्जन कृत्रीम हौदात करून मुर्त्यांची विटंबना थांबवावी – हिंदु जनजागृती समिती व विविध हिंदुत्ववादी संघटनातर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन 

0
520
Google search engine
Google search engine

अमरावती – 
 येथे छत्री तलावात भरपुर पाणी असतांना सुद्धा दरवर्षी त्याच्या एका बाजुला छोटा कृत्रीम हौद व फुग्याचे टब तयार करण्यात येतात व त्यामध्ये संपुर्ण शहरातील लहान-मोठ्या मुर्त्यांचे विसर्जन करण्यास भाग पाडले जाते. नंतर जे.सी.बी. ने विसर्जन न झालेल्या मुर्त्या पाण्यात ढकलतात व कचरा वाहुन नेणार्या गाडीमध्ये या मुर्त्यांची वाहतुक केली जाते. तलावात विसर्जन करू दिले तर अपघात होऊ शकतो व प्रदुषण सुद्धा होते असे हास्यास्पद कारण सांगण्यात येते. हे अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना न करता मुर्त्यांची विटंबना मात्र केली जात आहे. शहरातील लाखो लीटर सांडपाणी सर्रासपणे कुठलीही प्रक्रिया न करता पिण्याच्या जलस्त्रोतात सोडले जाते. मात्र या प्रदुषणाकडे दुर्लक्ष करून फक्त छत्रीतलाव चे पाणी पिण्यासाठी वापरले जात नसतांनाही फक्त गणपती विसर्जनामुळे प्रदुषण होते असा कांगावा केला जात आहे. ही विटंबना थांबवावी यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या तीन वर्षांपासुन लढा देत आहे. यावर्षी सुद्धा प्रथम महानगरपालिका आयुक्त श्री हेमंत पवार यांना भेटल्यावर त्यांनी वादग्रस्त भुमिकेत जाऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत वाद घातला व मला धर्म शिकवण्याची आवश्यकता नाही असे वक्तव्य केले. त्यानंतर हा विषय माझा नाही तर मी काही करू शकत नाही असे सुद्धा सांगीतले. 

नंतर हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जिल्हाधिकारी श्री खुशालसिंह परदेसी यांच्याकडे निवेदन व माहिती देण्यास गेले त्यावेळी त्यांनी मी तुमच्या भावना समजतो. यावेळी गणेशोत्सवाची बैठक होईल तेव्हा आम्ही तुम्हाला अवश्य संपर्क करू. व आयुक्त श्री हेमंत पवार यांसह मी चर्चा सुद्धा करतो असा सकारात्मक प्रतिसाद दिला. 

यावेळी हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतीष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, श्री योग वेदांत सेवा समिती या संघटनांचे १५ कार्यकर्ते उपस्थित होते.