माणसांच्या रूग्णालयात कुत्रे करतात आराम – चांदुर रेल्वे ग्रामिण रूग्णालयातील प्रकार

0
666
Google search engine
Google search engine

वैद्यकीय अधिक्षकांचे दुर्लक्ष

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

सर्वसामान्य मनुष्यांचा उपचार अल्पपैशात व्हावा या दृष्टीने सगळीकडे ग्रामिण रूग्णालय उभारण्यात आले आहे. यासोबतच जनावरांच्या उपचारासाठीसुध्दा पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र चांदुर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात सोमवारी अजबच प्रकार पहावयास मिळाला. रूग्णालयात रूग्णांसोबत चक्क कुत्रेसुध्दा आराम करीत असल्याचे दृश्य टिपल्या गेले आहे.
चांदुर रेल्वे शहरातील बस डेपो परीसरात ग्रामिण रूग्णालय असुन येथे अनेक नागरीक उपचार घेत असतात. तसेच अनेक रूग्ण रात्रीच्या वेळी मुक्कामसुध्दा करतात. रूग्णांसोबत असलेले नातेवाईक रूग्णाजवळ किंवा रूग्णालयातील समोरील भागात रात्री विश्रांती करतात. अशातच सोमवारी रूग्णालयातील समोरील भागात आराम करीत असतांना सोबत कुत्रेही मनसोक्त मुक्तसंचार करून विश्रांती सुध्दा करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. अशा प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचे रूग्णालयात कोणतेही लक्ष नसुन वैद्यकीय अधिक्षकांचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे दिसते. तसेच रूग्णालयात सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन या सर्व प्रकाराकडे वैद्यकीय अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.