कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

0
1188
Google search engine
Google search engine

🌸रामकृष्णहरि🌸

🙏कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

कार्तिकीचा सोहळा | चला जाऊं पाहू डोळां |
आले वैंकुठ जवळां | सन्निध पंढरीये ।।१।।

पीक पिकलें घुमरी | प्रेम न समाये अंबरी |
अवघी मातली पंढरी | घरोघरी सुकाळ ।।२।।

चालती स्थिर स्थिर | गरुडटक्यांचे भार |
गर्जती गंभीर | टाळ श्रुति मृदंग ।।३।।

मिळालिया भद्रजाती | कैशा आनंदे डुलती |
शुर उठावती | एक एक आगळे ।।४।।

नामामृत कल्लोळ | वृंदे कोंदली सकळ |
आले वैष्णवदळ | कळिकाळ कांपती।।५।।

आस करिती ब्रह्मादिक | देखुनि वाळवंटीचे सुख |
धन्य धन्य मुत्युलोक | म्हणती भाग्याचा कैसा ।।६।।

मरण मुक्ती वाराणसी | पितृऋण गया नासी |
उधार नाही पंढरीसी | पायापाशी विठोबाच्या।।७।।

तुका म्हणे आतां | काय करणे आम्हा चिंता |
सकळ सिध्दींचा दाता | तो सर्वथा नुपेक्षी ।।८।।

🌸रामकृष्णहरि🌸