अयोध्या प्रकरणी श्री श्री रविशंकर यांची मध्यस्ती अमान्य ! – डॉ. रामविलास वेदांती

0
684
Google search engine
Google search engine

नवी देहली –

 

अयोध्या प्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचा मध्यस्तीचा प्रस्ताव फेटाळून लावत आम्हाला त्यांची मध्यस्ती मान्य नाही, अशी माहिती राम जन्मभूमी न्यासाचे सदस्य तथा भाजपचे माजी खासदार डॉ. रामविलास वेदांती यांनी दिली. येथील कल्कि महोत्सवात ते बोलत होते.

डॉ. वेदांती पुढे म्हणाले, ‘‘राम जन्मभूमी आंदोलन हे केवळ राम जन्मभूमी न्यास आणि विश्‍व हिंदु परिषद यांनी केले असून त्यांचाच चर्चेचा अधिकार आहे. या आंदोलनासाठी आम्ही कारागृहात गेलो आहोत आणि खटलेही लढत आहोत. श्री श्री रविशंकर यांनी या आंदोलनात कधीही भाग घेतला नाही. मग त्यांना या प्रकरणात मध्यस्ती होण्याचा काय अधिकार ? त्यांनी कधी रामललाचे दर्शन घेऊन पूजा तरी केली आहे का ? या प्रकरणी मुसलमान धर्मगुरूंनी पुढे यावे आणि चर्चा करावी. परस्पर सहमतीने यावर तोडगा शक्य आहे.’’