चांदुर रेल्वेत रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला चपलांनी तुडवले-शिवसेनेचा निषेध

0
1238
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-


तूर खरेदी संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकत्याच केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ चांदुर रेल्वेच शिवसेनेतर्फे बस स्थानक परीसरात दानवे यांच्या प्रतिमेला चपला – जोड्यांनी तुडविण्यात आले.
        तूर खरेदी संदर्भात शेतकऱ्यांबद्दल रावसाहेब दानवे यांनी नुकतेच आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद चांदुर रेल्वे शहरात  उमटले. यावेळी तालुक्यातील शिवसैनिकांनी तालुका प्रमुख राजेश निंबर्ते यांच्या नेतृत्वात दानवे यांच्या प्रतिमेला चपला- जोड्यांनी तुडवुन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी राजेश निंबर्ते यांच्यासह स्वप्निल मानकर, बंडु आंबटकर, मोरेश्वर आंबटकर, त्रिलोकचंद मानकानी, कौस्तुभ खेरडे, अनुप डुबे, गजानन बोबडे, विशाल देशमुख, हेमंत हटवार, विजय जयसिंगपुरे, सुमित गायकवाड, पठाण आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती..