मुख्यमंत्र्यांचा वक्तव्याचा निषेधार्त अचलपूर नाभिक संघटनेतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध

0
1354
Google search engine
Google search engine

अचलपूर /-

 

 

पाटस येथिल भीमा शंकर सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ नाभिक समाजाने आज दुकाने बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मुख्यमंत्री जोपर्यंत नाभिक समाजाची जाहीर माफी मागत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी दिला आहे. आज अमरावती जिल्यातील अचलपूर येथेही  महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळ अचलपूर तालुका तर्फे स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

 

 

 

मुख्यमंत्री यांनी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा अचलपूर तालुक्यातील समस्त सलून दुकाने बंद ठेऊन “निषेध ” व्यक्त करण्यात येईल तसेच सरकार विरोधी प्रचार प्रसार करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे निवेदन देते वेळी सर्व श्री तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ अचलपूर तालुका संजय शिराळकर, महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळ अचलपूर तालुका  संदीप कान्हेरकर , भूषण राव , संतोष धानोरकर , शंभू कडू , विनोद कान्हेरकर , रवी मिसळकर ,रोषण निम्बोकार , दीपक राव तसेच समस्त नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते