गोरेगांव येथील राशन गोदामातुन रात्रीच्यावेळी राशनचा माल काळ्याबाजारात वितरीत

0
788
Google search engine
Google search engine





महेंद्र महाजन जैन  / रिसोड 

सेनगांव:- तालुक्यातील गोरेगांव येथील राशन गोदामातुन दि.२९ एप्रिल रोजी नियम धाब्यावर बसवुन रात्रीच्या १० वाजता राशनचा माल वाटप करण्याच्या नावाखाली काळाबाजार होत असल्याने याविषयी नागरीकांतुन तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी नागरीकांतुन होत आहे.
गोरेगांव येथील शासकीय राशन गोदामात दि.२९ एप्रिल शनिवारी रोजीच्या रात्री १० वाजता राशनचा माल काळ्या बाजारात वितरीत करीत असल्याचा प्रकार घडला आहे. सदर बाब ग्रामस्थाच्या लक्षात येताच संबंधीत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन सत्यता स्पष्ट करताच सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील राशन गोदामातुन रात्री अपरात्री राशनचा माल नेहमीच काळ्या बाजारात विक्री होत असल्याने याविषयी ग्रामस्थांकडुन संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. स्थानिक गोदाम अधिकारी तथा संबंधीत दुकानदारांच्या हात मिळवणीने शासकीय गोदामातुन राशनचा माल काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करुन आपले उखळ पांढरे करीत आहेत. परीणामी येथील लाभधारकांना मात्र राशनचा माल वेळेवर मिळत नसल्याने अनेकांना राशनच्या मालापासुन वंचीत राहण्याची वेळ आली आहे. गांवातील राशन लाभधारकांना शासनाच्या सोयीसुविधेचा लाभ मिळत नसल्याने याविषयी लाभधारकातुन तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. रात्री- अपरात्री नियमबाह्य राशनचा माल काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री होत असल्याने अनेक गरीब लाभधारकांना हक्काच्या राशनच्या मालापासुन वंचीत राहावे लागत आहे. याविषयी गांवातील नागरीकांनी हा प्रकार लक्षात येताच संबंधीत हिंगोली जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन याविषयी माहीती दिली असता सदरील प्रकरण दडपण्याचा प्रकार घडला आहे. यासंबंधी मात्र सत्यता नागरीकांसमोर येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर प्रकरणी वरीष्ठ अधिका-यांनी दखल घेऊन चौकशी करुन न्यायनिवाडा करण्याची मागणी गांवातील लाभधारकाकडुन होत आहे. याप्रकरणी चौकशी होते का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागुन आहे.