शेतकऱ्यांच्या तूर खरेदीसाठी बाजार समितीत तहसीलदार यांनी ठाण मांडले महसूल, कृषीविभाग , बाजार समितीच्या पुढाकाराने शासकीय तूर खरेदी

0
611
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे:- (शहेजाद  खान)

 राज्यात सर्वात जास्त तुरीचे उत्पन्न झाल्यामुळे राज्यशासनाने स्वतः तूर खरेदीचा निर्णय घेतला. मात्र शहरातील बाजार समितीत मंद गतीने तुर खरेदी सुरू असल्याचा आरोप शेतकरी करीत होते. तेव्हा शेतकऱ्यांची ओरड लक्षात घेता तहसिलदार  बी.ए. राजगडकर यांनी गुरूवारी बाजार समितीत सायंकाळी 7 वाजतापर्यंत स्वत:  उपस्थित राहून बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची तूर खरेदी करून मोजमाप करवुन घेतले.


       महाराष्ट्र राज्याच्या आदेशानुसार चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 22 एप्रिल पर्यंत आणलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप युद्ध स्तरावर सुरु झाले. गुरूवारी 35 शेतकऱ्यांची 700 क्विंटल पर्यंतची मोजमाप पूर्ण करण्यात आले. परंतु त्या पैकी 29 शेतकरी आलेच नसल्याने तुरीचे मोजमाप खोळंबळे असल्याची माहिती तूर खरेदी समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. समितीत तहसीलदार राजगडकर,  सहाय्यक निबंधक बी.एस .पारिसे, बाजार समितीचे सचिव चेतन इंगळे व विदर्भ मार्केटींग को.फेडरेशनचे कोल्हे यांच्या समक्ष ग्रेडिंग करून सायंकाळी 7 पर्यंत बाजार समितीत मोजमाप सुरु होते. अनेक दिवसांपासुन शेतकऱ्यांची तुर बाजार समितीच्या आवारात पडली असुन अवकाळी पावसाचा हवामानामुळे 22 तारखेच्या आतील शेतकऱ्याच्या तुरीचर मोजमाप करण्याचे ठरविले होते. मात्र शेतकरी गैरहजर असल्याने बाजार समितीचे सभापती प्रा. प्रभाकर वाघ यांनी दूरध्वनी करून शेतकऱ्यांशी संपर्क केल्याचे सांगण्यात आले.