बोंड अळी मुळे ४एकरातील पऱ्हाटी उपटली-शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी

0
734
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधी/गजानन खोपे

भातकुली – तालुक्यातील अनेक भागातील मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहण्सा मिळला आहे,याप्रकरणात मागिल आठ दिवस आगोदर कपाशी बियाण्याच्या कंपनीवर गुन्हा सुध्दा नोंदविण्यात आला,मात्र कपाशी वेचाण्यासाठी लागणारा खर्चही आता निघणे कठीण झाल्याने वाठोडा शुक्लेश्वर येथील शेतकरी सतीश जांमोदकर यांनी आपल्या ४ एकर शेतातील कपाशीचे उभे पीक उपटुन काढले आहे,त्या मुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहेत,दोन दिवसा अगोदर बोंड अळीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश देण्यात आला आहे,मात्र सतीश जामोदकर यांना त्यांचा लाभ मिळणार की नाही हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे,भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील शेतकरी सतीश जामोदकर यांनी आपल्या चार एकर शेतामध्ये कपाशीची लागवड केली होती,अंदाजी आतापर्यंत चा एकंदरीत खर्च पाहता २५ते३०हजार रूपये असुन या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,