कोरेगाव (भीमा) घटनेचे बुलडाण्यातील खामगावात पडसाद,  फोडली एसटी #BhimaKoregaon

0
668
Google search engine
Google search engine

खामगाव ( बुलडाणा ) – पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या वादाचा निषेध करण्यात येत आहे. याचे पडसाद खामगाव तालुक्यातही उमटले. निषेध म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्री गवळी येथे एका एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.